26 snake found at bhilgaon kamthi bisan gondane house nagpur Sakal
नागपूर

Nagpur News : बापरे.. घरात आढळले सव्वीस साप; भिलगाव कामठी येथील घटना

साप म्हटले की भल्याभल्यांची तारांबळ उडते. पण एक दोन नव्हे, तर तब्बल २६ साप एका घरात आढळले असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साप म्हटले की भल्याभल्यांची तारांबळ उडते. पण एक दोन नव्हे, तर तब्बल २६ साप एका घरात आढळले असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. भिलगाव कामठी येथील बिसन गोंडाणे याच्या घरी सापांची तब्बल २६ पिल्ले आढळून आली आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली. पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घराबाहेर बघ्यांची गर्दी जमली.

गोंडाणे यांना घरी दोन साप दिसल्याने कुटुंबीय खूप घाबरले. त्यांनी तातडीने वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य सर्पमित्र सागर चौधरी यांना ही माहिती दिली. ते सर्पमित्रांना घेऊन घटनास्थळी पोहचले. सापांना पकडण्यास सुरवात केली.

थोडा कचरा काढल्यानंतर सागरला सापाची आणखी पिल्ले दिसली. साप बिनविषारी असल्याचे त्यांनी सांगितले. अथक परीश्रमानंतर एक एक करून तब्बल सव्वीस साप त्यांनी पकडले. कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पावसामुळे सापाच्या वारुळात पाणी आणि माती जमा होते. त्यामुळे ते बाहेर येतात आणि नवीन अधिवास शोधतात. आता उन्हाळा असला तरी दोन दिवस झालेल्या पावसाने हे साप वारुळाच्या बाहेर निघाले असावेत. तसेच थंड वातावरणामुळे ते वारुळातून बाहेर निघून अशा घरांमध्ये शिरले असल्याचे सर्पतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT