Nagpur Rain Update Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : अतिवृष्टी, पुरामुळे विभागात ४० हजार हेक्टर क्षेत्र बाधित; ४९ हजार ४३० शेतकऱ्यांचे नुकसान

Nagpur Latest news in marathi |मागील चार दिवसांपासून विभागात सुरू असलेली अतिवृष्टी व पुरामुळे ४३ तालुक्यातील सुमारे ४० हजार १७१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील चार दिवसांपासून विभागात सुरू असलेली अतिवृष्टी व पुरामुळे ४३ तालुक्यातील सुमारे ४० हजार १७१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. ४९ हजार ४३० शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

विभागात शुक्रवारी(१९ जुलै) अतिवृष्टीला सुरुवात झाली. नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळेही शेतांमध्ये पाणी शिरून शेतपिकांचे नुकसान झाले. कापूस, तूर, सोयाबीन, मिरची, धान, भाजीपाला आदी पिकांचा यात समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ६ हजार ७६३ क्षेत्रातील भात, कापूस, सोयाबीन, मिरची, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. ६ हजार ६५० शेतकऱ्यांचा याचा फटका बसला.

चंद्रपूर जिल्ह्यात १२ तालुक्यातील ११ हजार २२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये १५ हजार ५२५ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यातील ८ हजार २७७ क्षेत्र बाधित असून यामध्ये ९ हजार ७८० शेतकऱ्यांचा समावेश आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ४८२ हेक्टर क्षेत्रातील ८६५ शेतकरी बाधित झाले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ८ हजार ५७५ हेक्टर बाधित क्षेत्र १६ हजार ११० शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात पाच तालुक्यात ४ हजार ८३९ हेक्टर बाधित क्षेत्र असल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय कृषी सहसंचालक यांनी व्यक्त केला आहे.

विभागात सरासरी पेक्षा ३४.३५ टक्के जास्त पाऊस

विभागात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सरासरी पेक्षा ४३.३५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. विभागाची आजपर्यंतची पावसाची सरासरी ४६७.६ मि.मी. असून आजपर्यंत प्रत्यक्ष ६२८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजच्या सरासरी पेक्षा १३४.३५ मि.मी.अधिकचा पाऊस पडाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT