Camel Sakal
नागपूर

तब्बल ३५ दिवसांनी ५८ उंटांनी घेतला मोकळा श्वास

‘सत्य की जीत हुयी है. अब हम हायकोर्ट (High Court) में जाएंगे. जिन्होने हमको और ऊँटो को बेफजूल तकलीफ दी. उनको सत्य की ताकद दिखायेंगे.’’

प्रमोद काळबांडे

‘सत्य की जीत हुयी है. अब हम हायकोर्ट (High Court) में जाएंगे. जिन्होने हमको और ऊँटो को बेफजूल तकलीफ दी. उनको सत्य की ताकद दिखायेंगे.’’

नागपूर - अखेर तब्बल ३५ दिवसांनी ५८ उंटांनी (Camel) कोंडवाड्यातून मोकळा श्वास (Release) घेतला. जखरा रबारी म्हणाले, ‘सत्य की जीत हुयी है. अब हम हायकोर्ट (High Court) में जाएंगे. जिन्होने हमको और ऊँटो को बेफजूल तकलीफ दी. उनको सत्य की ताकद दिखायेंगे.’’

‘सकाळ’च्या शाळाबाह्य बालकांच्या ‘शाळेत नेऊ सर्वांना’ या अभियानात मेंढीपालक रब्बारी आणि गोपालक भरवाड समुदायाने सहभाग नोंदविला होता. या समुदायांच्या अनेक शाळाबाह्य बालकांना या अभियानातून शाळेत दाखल करून घेण्यात आले. रबारी समुदाय उंटाचा वापर कुटुंब-कबिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर नेण्यासाठी करतात, हे या अभियानातून अवगत झाले होते. त्यामुळे जेव्हा सात जानेवारी रोजी कत्तलीच्या शंकेवरून प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली, तेव्हापासून ‘सकाळ’ने या विषयावरील सत्यस्थितीचे विविध पैलू उलगडून दाखविले. बैल किंवा गाय जसे शेतकऱ्याचे साधन आहे, तसेच उंट हा रबारी समुदायाचे साधन आहे, हे निक्षून सांगितले.

पशुपालकांचे युवा अभ्यासक सजल कुलकर्णी, अजिंक्य शहाणे, भरवाड समाजाचे रामाजी जोगराणा, रबारी समाजाचे पर्बत रबारी, मशरू रबारी, साजन रबारी, जखरा रबारी यांनी यांनी या लढ्यात मोलाची भूमिका बजावली. अॅड. मनोज कल्ला, अॅड. शिरीश जाखड आणि अॅड. खुशाल दवे यांनी याप्रकरणी विशेष अभ्यास करत न्यायालयात युक्तिवाद केला. आज अखेर उंटांना गोशाळेतून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मालकांकडे त्यांची रवानगी करण्यासाठी ते पुढच्या प्रवासाला निघाले. उंटाना बाहेर पडताना पाहून साजन रबारी आणि उंटासोबत असलेल्या रबारी मजुरांचे डोळे डबडबून आले होते.

ऊँटो को एक जगह से दुसरे जगह ले जाना, ये रबारी लोगो का हमेशा का काम है. आगे चलके ऐसी मुश्किले ना आए इसलिए हमे एक सिस्टिम बिठानी होगी. ऐसे मुश्किल मोकोपे पशू अभ्यासक सजल कुलकर्णी और ‘सकाळ’ परिवारने हमारा साथ दिया, इसके लिए हम दिलसे शुक्रिया अदा करते है.

- जखरा रबारी, मेंढीपालक और सामाजिक कार्यकर्ता, गुजरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT