prabha raut
prabha raut e sakal
नागपूर

वॉरियर आजी! तीन वेळा झाली कोरोनाची लागण; दमा, बीपी असूनही केली मात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साठी पार केलेल्या आजीने तब्बल तीनवेळा कोरोनाला (corona virus) हरविण्यात यश (old woman beat corona) मिळविले आहे. हिंमत, आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, कुटुंबीयांची साथ व प्रभावी उपचाराच्या जोरावर तिने कोरोनाशी मुकाबला करत या आजाराला घाबरणाऱ्यांना नवी दिशा दाखवली आहे. आजीच्या या संघर्षाला परिसरातील अनेकजण सलाम करीत आहेत. (68 years old woman beat corona three times in nagpur)

ही प्रेरणादायी कहाणी आहे जगताप ले-आउट, वानाडोंगरी येथील ६८ वर्षीय प्रभा राऊत यांची. कोरोना आल्यापासून प्रभा या कधीही घराबाहेर पडल्या नाहीत. मात्र, काळजी घेऊनही त्या पहिल्याच लाटेत दोनवेळा कोरोनाच्या कचाट्यात सापडल्या. पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्यानंतर दमा व बीपीचा त्रास असल्याने प्रभा यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन लागला. मात्र, वॉर्डातील आजूबाजूचे रुग्ण एकापाठोपाठ एक मरत असल्याचे पाहून त्या घाबरल्या. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना वानाडोंगरीतील एका खासगी रुग्णालयात शिफ्ट केले. जवळपास दोन आठवडे जीवनमृत्यूशी संघर्ष करीत त्या ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या.

कोरोनामुक्त होऊन पंधरा दिवस लोटत नाही तोच पुन्हा त्यांना कोरोनाची बाधा झाली. परत दवाखान्यात भरती करण्यात आले. यावेळी तब्बल महिनाभर त्यांना कोरोनाशी दोन हात करावे लागले. पहिल्या लाटेतील दुहेरी धक्क्यातून बचावल्यानंतर दुसऱ्या लाटेत कोरोनाने त्यांच्यावर हल्ला चढवला. लवकर निदान झाल्याने व लक्षणे सौम्य असल्याने यावेळी घरीच उपचार घेऊन त्या बऱ्या झाल्या. विविध आजार असूनही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिन्ही वेळा कोरोनाला मात दिली. आईपासून प्रेरणा घेत त्यांचा थोरला मुलगा प्रफुल्ल व सून स्वातीनेही कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली.

कोरोनामुळे आईसह आमच्या घरातील तीन सदस्य एकाच वेळी पॉझिटिव्ह आल्याने आम्ही थोडे टेन्शनमध्ये आलो होतो. मात्र, प्रत्येकाने एकदुसऱ्याला हिंमत दिल्यामुळे आम्ही या संकटातून बाहेर पडू शकलो. प्रबळ इच्छाशक्ती व योग्यवेळी मिळालेल्या उपचारामुळेच हे शक्य झाले.
-पंकज राऊत, धाकटा मुलगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT