नागपूर

मटण पार्टीसाठी चोरला चक्क बकरा; बकरीमालकावर केला चाकूने हल्ला

अनिल कांबळे

नागपूर : तीन गुंडांनी मित्रांना मटण पार्टी देण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी त्यांना रानातून बकरा चोरण्याचा प्लान (Goat stealing plan) केला. रानात चरत असलेली बकरी चोरली. मात्र, बकरा मालकाच्या हे लक्षात आले. त्याने विरोध करीत बकरा हिसकण्याचा प्रयत्न केला असता गुंडांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला (Knife attack) केला. ही घटना कळमन्यातील हस्तीनापूर विटा भट्टीजवळील रानात घडली. (A stolen goat for a meat party, Nagpur crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकृपा हाउसिंग सोसायटी येथे राहणारे चंदन अरुण खैरकर (४१) हे आचारीचे काम करतात. त्याच्याकडे बकऱ्या आहेत. सध्या लॉकडाउन असल्याने आणि काम नसल्याने ते बकऱ्या चारायला नेत होते. नेहमीप्रमाणेच शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ते हस्तीनापूर वीटभट्टीजवळ त्यांनी बकऱ्या चारायला नेल्या होत्या. जवळच उभे राहून चंदन बकऱ्यांवर लक्ष ठेवून होते.

परिसरातील गुंड चेतन ठाकूर (२१, रा. आजरी माजरी), शोएब खान (२१) आणि त्यांचा एक साथीदार यांनी मित्रांना मटण पार्टी द्यायची होती. त्यासाठी जवळपास ७ ते १० किलो मटण लागणार होते. गुंडांकडे पैसे देऊन मटण आणण्यापेक्षा बकरी चोरण्याची प्लान केला. बकरी चोरण्यासाठी ते हस्तीनापूर वीटभट्टीजवळ आले. तेथे बकऱ्या चरताना दिसल्या. तिघेही तेथे दुचाकीने आले. त्यांनी बकरी चोरली आणि दुचाकीवर बसले. चोरांनी दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी सुरू झाली नाही.

बाजूला उभे असलेले बकरी मालक चंदनच्या लक्षात हा प्रकार येताच ते धावतच तेथे आले. त्यांनी गुंडांना विरोध करीत बकरी हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शोएबने चाकू काढून चंदनच्या यांच्या डाव्या बरगडीवर वार केला. घटनास्थळी दुचाकी सोडून चोरटे दहा हजार रुपये किंमत असलेली बकरी घेऊन गेले. याप्रकरणी चंदन यांनी लगेच कळमना पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला. दुचाकीचा तपास केला असता ती दुचाकी कन्हान येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. कळमना पोलिस पुढील तपास करीत आहे.

(A stolen goat for a meat party, Nagpur crime news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT