Adverse effects on online health due to online education 
नागपूर

ऑनलाईन शिक्षण, अस्थिर मन, आजारी तन, मिळाले काय?

संदीप भुयार

कळमेश्वर (जि. नागपूर) : संकटातून मार्ग शोधण्याची क्षमता माणसात निर्माण करणे, हेच शिक्षणाचे खरे ध्येय. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी याच ध्येयासक्तीतून शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र, घरातून बसून मोबाईलवर शिकणारे विद्यार्थी शिक्षणाशिवाय केवळ मोबाईच्याच प्रेमात आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. तासनतास मोबाईलकडे पाहण्याने लहानग्यांच्या शरीरावर आणि मनावरही विपरित परिणाम होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

२६ जूनपासून यंदा प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली़. आता शाळांनी त्यासाठी तयारी करून दररोज अध्यापन केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरात ॲन्ड्राईड मोबाईल नव्हता, त्या पालकांनी तजवीज करून मोबाईल घेतला़. मात्र, आता ठराविक कलावधीत होणाऱ्या ऑनलाईन शालेय तासिकांच्या व्यतिरिक्तही विद्यार्थी दिवस-दिवसभर मोबाईलचा नाद सोडायला तयार नाही.

तास-अर्धा तासाचे ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतरही मुले मोबाईल गेम खेळत असतात. तज्ज्ञांच्या मते ही बाब त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आघात करीत आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नसला तरी मुलांचे ‘मोबाईलवेड’ पक्के करण्यासाठी सध्याची परिस्थिती कारणीभूत ठरत आहे.

आठवड्यातून २० तासापेक्षा अधिक मोबाईल हाताळल्यास ते ॲडीक्शन होय. मोबाईलच्या सतत वापराने मुलांच्या डोळयावर परिणाम होत असून ते ॲम्लोफिया आजाराचे बळी ठरत आहेत. झोप लागण्याचे प्रमाण घटत आहे.

मोबाईलमध्ये गुंतल्याने इतरांशी संपर्क कमी झाला असून त्यातून ताणतणाव वाढत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा, रागावणे, भांडणे यासारखी प्रवृत्ती वाढत आहे. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थी शिस्त पाळत नाही़. अनेक जण तासिका रेकॉर्ड करून आपल्या सोईप्रमाणे ऐकण्याचा बहाण करतात़. ऑफलाईन शिक्षणाप्रमाणे यात विद्यार्थी-शिक्षक यांचा संवाद निट होत नसल्याने मुलांचा मानसिक विकास हवा तसा होत नाही.

पालकांनी हे करावे उपाय

मुलांना मोबाईल वापरण्यासाठी वेळेची मर्यादा घालून द्यावी, ही वेळ दोन तासापेक्षा अधिक नसावी. ते वेळ पाळतात का यावर लक्ष ठेवावे. ऑनलाईन पध्दतीने कधीही शिक्षण शक्य असले तरी रविवारी जाणीवपूर्वक मुलांना सुटी दिलीच पाहिजे. ऑनलाईन तासिकेमध्ये दहा ते पंधरा मिनिटांचा रेस्ट घ्यावाच. सध्या मुलांना इतरत्र फिरता येत नसले तरी त्यांना नृत्य, गायन, वादन अशा ‘इनडोअर’ प्रकारात गुंतवावे.

ऑनलाईन शिकवणी वर्गाचाही ताण

शालेय अभ्यासक्रमासोबतच खासगी शिकवणी वर्गही ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. बहुतांश विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमापेक्षाही अधिक शिकवणी वर्गांच्या क्लासेसला ऑनलाईन हजेरी लावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ‘स्क्रिन टाईम’ अधिकच वाढत आहे. शासनाने वयोगटानुसार ऑनलाईन क्लासेससाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. मात्र खासगी शिकवणी वर्गामुळे ही मर्यादा ओलांडली जात आहे. पालकांनी याबाबतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT