Agriculture Department gave Promotion on retirement nagpur  sakal
नागपूर

Nagpur News : निवृत्तीच्या दिवशी पदोन्नती!

कृषी विभागातील प्रकार ः सेवा ज्येष्ठता यादी डावलली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : निवृत्तीच्या दिवशीच काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रताप कृषी विभागाने केला आहे. सेवा ज्येष्ठता यादी डावलून या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याचे समजते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांप्रमाणेच कृषी विभागातील अधिकारीही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहे.

एका स्वाक्षरीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून पदोन्नतीची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात अडकून पडली आहे. यामुळे राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा परिणाम प्रशासकीय कामांवर होत असल्याची चर्चा आहे.

राज्यात अधीक्षक कृषी अधिकारी पदाची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात प्रभारीवर काम सुरू आहे. कृषी विभागाने ८० वर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे निश्चित केले. कृषी उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना अधीक्षक कृषी अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक सात महिन्यांपूर्वीच झाली.

त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून फाइल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन महिन्यांपासून फाइल कार्यालयात पडून आहे. दरम्यानच्या काळात ९ जणांना पदोन्नती देण्यात आली. आता नव्याने तिघांना पदोन्नती दिल्याची माहिती असून निवृत्तीच्या दिवशी ही पदोन्नती देण्यात आली. यासाठी सेवाज्येष्ठता यादी अंतिम करण्यात आली. परंतु ती डावलून निवृत्त होणाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT