Anil Deshmukh sakal
नागपूर

Anil Deshmukh : ई-पीक पाहणीची अट रद्द करा आमदार अनिल देशमुख : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

Anil Deshmukh : आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादनामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसाठी सरसकट मदत दिली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विरोधी पक्षाने केल्यावर सरकारने कापूस आणि सोयाबीनला १० हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली. मात्र यासाठी ई-पीक पाहणीची अट टाकल्याने ९० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. ही जाचक अट रद्द करीत सरसकट मदत द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे आणि राज्य सरकारने यासंदर्भात केंद्राकडे धोरणात बदल करण्यासाठी कोणताही पाठपुरावा न केल्याने शेतमालाला दोन वर्षांपासून योग्य भाव मिळाला नाही. यामुळे अनेक वेळा या संदर्भात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भात अनिल देशमुख यांनी विधानसभेत आवाज उठवला. तरी परत राज्य सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते.

आता निवडणुका जवळ आल्याने सोयाबीन व कापसू उत्पदकांना दोन हेक्टरपर्यत १० हजार रुपयांची मदत जाहीर केली. बाजारात कापूस व सोयाबीनला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परंतु १० हजार रुपयांची मदत देऊन त्यांच्या तोडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.

मोसंबीच्या नुकसानीसाठी मदत द्या

पावसामुळे विदर्भातील मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. गळीचे कारण अजून पुढे आले नाही. यामुळे राज्य शासनाने तातडीने पीक पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी तसेच कृषी विभागातील तज्ज्ञानी यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना उपयोजना सुचवाव्यात अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्रातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT