balasaheb Thackeray International Zoo lee tigeress third baby death nagpur  sakal
नागपूर

तिसऱ्यांदा ‘ली’ वाघिणीच्या बछड्यांचा मृत्यू

मंगळवारी जन्मलेल्या बछड्याची तिने शेपूट पकडून गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला व तो मृत पावला.

राजेश रामपूरकर

नागपूर : बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘ली’ या वाघिण तिसऱ्यांदा मातृत्वाला मुकली आहे. मंगळवारी जन्मलेल्या बछड्याची तिने शेपूट पकडून गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला व तो मृत पावला. ‘ली’ ही वाघीण अवघी महिनाभराची असताना २००९ साली चंद्रपूर जिल्ह्यातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आली. तीन वर्षांपूर्वी ‘राजकुमार’ हा वाघ भंडारा जिल्ह्यातील एका लग्नसमारंभात पोहोचल्याने त्याची रवानगी थेट गोरेवाड्यात करण्यात आली. त्याला सोबत म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून ‘ली’ ला देखील गोरेवाड्यात आणले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात दोघांनाही सफारीसाठी एकत्रच सोडण्यात आले. त्यातून १३ वर्षाची ‘ली’ गर्भवती राहिली.

मंगळवारी (३१ मे) दुपारी ‘ली’ला प्रसूती वेदना सुरू झाल्या. चार वाजता तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर तिने बछड्याची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला व तो मृत पावला. ‘ली’ पुन्हा दुसऱ्या बछड्याला जन्म देईल म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाट पाहिली, पण बुधवारी सकाळपर्यंत तसे काही झाले नाही.

यापूर्वी २०१८ साली ‘ली’ गोरेवाडा बचाव केंद्रात ‘साहेबराव’ या वाघापासून गर्भवती राहिली होती. त्यावेळी देखील तिने चारही बछडे गमावले. तर महाराजबाग प्राणिसंग्रहालयात देखील ‘साहेबराव’ या वाघापासून ती गर्भवती राहिली, पण तिथेही तिने बछडे गमावले. तीनदा मातृत्वाची अनुभूती येऊनही तीला त्याचा आनंद उपभोगता आला नाही. कारण तीला लहानपणी आईने वागविलेले नसल्याने हा प्रसंग होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT