corona 
नागपूर

बीडीओने का दिला कामावर रुजू होण्यास नकार?

सकाळवृत्तसेवा

नागपूर : सामूहिक प्रयत्नांतूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्‍य आहे. परंतु काही जण या कामातून पळवाटा शोधत असून काही तर रुजूच होत नसल्याची माहिती आहे. कोरोनामुळे ड्यूटी लावण्यात आलेल्या जागी एका बीडीओने रुजू न होता अप्रत्यक्षरित्या काम करण्यास नकार दिला. त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार संबंधित बीडीओच्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यासाठी कर्मचारी गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परत बोलावून घेतले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

काही अधिकारी, कर्मचारी कोरोनाशी लढा देण्याच्या तयारीत नाहीत. ते कामाच्या ठिकाणीच येत नसल्याचे सांगण्यात येते. शहरालगत असलेल्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात कोरोनाचे संशयित रुग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. या करता एका बीडीओची ड्युटी लावण्यात आली. दोन दिवस झाल्यावर संबंधित बीडीओ रुजूच झाले नाही. त्यांनी अप्रत्यरित्या काम करण्यास नकार दिला. त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याचा आधार घेत संबंधित बीडीओच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले. विशेष म्हणजे संबंधित बीडीओला नोटीस बजावण्यात आली नसल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

वसतिगृहात क्वारंटाईनची व्यवस्था करण्यास विरोध 
कोरोनाचे रुग्णांसाठी शासकीय इमारतीनंतर समाजकल्याण विभागाचे मुक्ताई वसतिगृहात क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येणार होती. परंतु, याला काहींनी विरोध दर्शविल्याने ते रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. वानाडोंगरी येथील समाजकल्याणच्या वसतिगृहात क्वारंटाईनची व्यवस्था करण्यास विरोध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन भिजले

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT