Beloved four months pregnant, rape case against boyfriend 
नागपूर

"आई प्लीज... तो बलात्कार नव्हे... प्रेम आहे आमचे'

अनिल कांबळे

नागपूर :  जयश्री (बदललेले नाव) बारावीची विद्यार्थिनी तर आदित्य देशमुख एका बॅंकेत नोकरीला. ट्युशन क्‍लासेमध्ये दोघांची ओळख झाली. एकमेकांचा मोबाईल क्रमांक घेऊन ओळख वाढली. दोघांचे प्रेम फुलले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरी कुणी नसताना दोघांनीही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्या आईला संशय आला. डॉक्‍टरांकडे नेल्यानंतर बिंग फुटले. आईने तिचा हात पकडला आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी जयश्रीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री गरुड खांब परिसरात राहते तर आरोपी आदित्य देशमुख झेंडा चौक महालमध्ये राहतो. जयश्री बारावीत असताना तिने महालमध्ये ट्युशन क्‍लास लावला होता. त्याच इमारतीत स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस चालायचे. त्या क्‍लासेसमध्ये आरोपी आदित्य देशमुख क्‍लास करीत होता. आदित्य गांधीबागमधील एका बॅंकेत नोकरीसुद्धा करीत होता. तसेच एका नामांकित ढोल पथकात वाद म्हणून काम करीत होता. दोघांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. रोज क्‍लासमध्ये दोघांच्या भेटी होत होत्या.

दोघेही फुटाळा, अंबाझरी आणि लॉंग ड्राइव्हला जात होते. यादरम्यान दोघांची मैत्री घट्ट झाली. आदित्य आणि जयश्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जयश्री बारावीत असल्याने 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आई-वडिलांना सांगून लग्न करूया, असा प्लान तयार झाला. दरम्यान दोघेही हातात हात घालून फिरायला लागले. आदित्यच्या घरी कुणी नसल्यास ती थेट त्याच्या घरी जायला लागली. माझी मैत्रीण असल्याचे त्याने तिची ओळख घरी करून दिली. तर आदित्यलाही तिने दोनदा घरी नेऊन आईशी भेट घालवून दिली. फक्‍त मित्र आहे, एवढी ओळख दिली.

दोघांच्या प्रेमाने सीमा ओलांडली. एकदा आदित्यने घरी कुणीही नसल्यामुळे जयश्रीला घरी बोलावले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. परंतु, आता लग्नच करणार आहे, असे सांगून आदित्यने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र आदित्यच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तर कधी जयश्रीसुद्धा त्याला घरी बोलावत होती.

पोट दुखले आणि बिंग फुटले

जयश्री जवळपास चार महिन्यांची गर्भवती झाली. तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिला डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी तपासणी करून ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईला धक्‍काच बसला. आईचा विश्‍वास न बसल्यामुळे डॉक्‍टरांना पुन्हा चेकअप करण्यास सांगितले. मात्र, डॉक्‍टरांनी थेट रिपोर्ट दाखवून चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

आईने दवाखान्यातच जयश्रीच्या कानाखाली दिली. कोण आहे तो? अशी विचारणा केली. आदित्य देशमुखचे नाव सांगताच पुन्हा चिडली. घरी नेल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. सर्वांनी पोलिसांत तक्रार करण्याचे ठरविले. मात्र, जयश्री पोलिसांत तक्रार देण्यास तयार नव्हती. "आई तो माझा प्रियकर आहे... आम्ही लवकरच लग्न करणार आहोत... आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे...' असे म्हणून समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

प्रियकर आदित्य देशमुख याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानेही जयश्रीवर प्रेम असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, तिचे वय केवळ 17 वर्षे असल्याने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिस ठाण्यात जयश्री आणि आदित्य दोघेही एकमेकांकडे बघून रडत होते, अशी स्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

Ganesh Chaturthi 2025: भारतभर गाजणारा बाप्पांचा जल्लोष! जाणून घ्या विविध राज्यांतील खास गणेशोत्सवाच्या परंपरा

Latest Marathi News Updates : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला

SCROLL FOR NEXT