bhivapur female students sakal
नागपूर

Nagpur : गर्दीचा फायदा घेत एसटीचे चालक-वाहक धक्काबुक्की करतात,'बॅड टच' बाबत विद्यार्थिननी केली तहसीलदारांकडे तक्रार

Nagpur : भिवापूरमधील विद्यार्थीनींनी एसटी बसमध्ये चालक व वाहकांकडून होत असलेल्या धक्काबुक्की, शिवीगाळ आणि गैरवर्तनाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर : एसटी बसने ये-जा करतांना बसचे चालक-वाहक धक्काबुक्की करतात, शिव्या देतात कधी-कधी मारतात.एसटी कर्मचाऱ्यांच्या या अभद्र वागणुकीमुळे विद्यार्थीनींना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. या जाचातून मुक्ती मिळावी. यासाठी पिडीत विद्यार्थिनींनी शुक्रवारी तहसील कार्यालयात तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांची भेट घेत, आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली.

या पिडीतांमध्ये मांगली, नक्षी, पांढरवानी या गावच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थिनी येथील भिवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असून दररोज एसटी बसने ये-जा करतात. बस मध्ये चढता उतरतांना व प्रवासादरम्यान त्यांना बसचे चालक व वाहक यांच्याकडून होत असलेला त्रास त्यांनी तहसीलदार डहाट यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन डहाट यांनी यावेळी विद्यार्थिनींना दिले.

विद्यार्थीनींसोबत होतो दुव्यवहार

शिक्षणासाठी मोखाळा, भागेबोरी, मांगली, नक्षी, वढध, मेढा, झिलबोडी, हत्तेबोडी, पांढरवानी, जवळी, तातोली, बोर्डकला आदी गावातील शाळा, कॉलेजचे मूलं, मुली दररोज भिवापूरला ये-जा करतात. या मार्गावर मोजक्याच बसेस असल्याने बसमध्ये गर्दी होऊन दाटीवाटीने विद्यार्थी भरले जातात. नेमके याच संधीचा फायदा उचलत चालक व वाहकाकडून विद्यार्थिनींसोबत दु्रव्यवहार केला जातो.

प्रवासादरम्यान कोंबले जातात विद्यार्थी

एकाच वेळी सर्वच शाळांना सुटी होत असल्याने विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास फारच वेदनादायी असतो. मुलं मुली अक्षरशः बसमध्ये कोंबले जातात. अशा स्थितीत विशेषतः विद्यार्थिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. चालक वाहकासोबतच अनेकदा बसमधील अन्य प्रवाशांच्याही "बॅड टच" च्या वेदना विद्यार्थिनींना मुकाट्याने सोसाव्या लागतात.

एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी चवरे यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांना ये जा करतांना होत असलेल्या त्रासाविषयी त्यांना अवगत केले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन चवरे यांनी दिले.

- कल्याणकुमार डहाट, तहसीलदार भिवापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT