येथील शेतातील पोल्ट्री फार्म. sakal
नागपूर

Nagpur : कुक्कुटपालनाबरोबर चिकन प्रोसेसिंगचे मार्गदर्शन

ब्रॉयलर (मांसासाठीचे पक्षी) पोल्ट्री उद्योगातील संधी, अंदाजे गुंतवणूक, पक्ष्यांचे खाद्य, आजार, लसीकरण, पोल्ट्रीचे अर्थशास्त्र, मार्केटिंग व्यवस्थापन, बँक फायनान्स, करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग, टेक्नो कमर्शिअल आस्पेक्ट, चिकन प्रक्रिया, चिकन पदार्थांचे मूल्यवर्धन इ. विषयी मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

Pune - ब्रॉयलर (मांसासाठीचे पक्षी) पोल्ट्री उद्योगातील संधी, अंदाजे गुंतवणूक, पक्ष्यांचे खाद्य, आजार, लसीकरण, पोल्ट्रीचे अर्थशास्त्र, मार्केटिंग व्यवस्थापन, बँक फायनान्स, करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग, टेक्नो कमर्शिअल आस्पेक्ट,

चिकन प्रक्रिया, चिकन पदार्थांचे मूल्यवर्धन इ. विषयी मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण ११ व १२ फेब्रुवारी रोजी आयोजिले आहे. कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र दिले जाणार असून या क्षेत्रात उतरू पाहणारे शेतकरी, युवावर्गासाठी हे प्रशिक्षण फायदेशीर ठरणारे आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी पोल्ट्री फार्मला शिवार फेरीचे आयोजन आहे. चहा, जेवण, प्रमाणपत्र व शिवारफेरीसह प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार पाचशे रुपये आहे.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

मधमाशी पालन केवळ मधासाठी नसून परागीभवनासाठीही आहे. ज्याद्वारे पीक उत्पादन वाढीस मदत होते. अनेक पिकांमध्ये याचे उत्तम परिणाम दिसून आल्याने या व्यवसायात भरपूर वाव आहे. मधमाशीपालन व्यवसाय म्हणून कसा करावा,

मध उत्पादन घेण्यापासून ते मधमाशीपालनात उद्योजक कसे व्हावे याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा १७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. ज्यात मधमाशांचे महत्त्व, विविध जाती, जीवनचक्र, वसाहतींचे व्यवस्थापन, मधमाशा हाताळणी, काळजी, मधमाशांपासून मिळणारे उपपदार्थ, मध प्रक्रिया इ.

विषयी मधमाश्‍यांच्या संवर्धनात अनेक वर्षांपासूनचा प्रॅक्टिकल अनुभव असणारे तज्ज्ञ हेमंतकुमार डुंबरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसांपैकी एक दिवस संपूर्ण प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क सहा हजार रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT