blood shortage in GMC super specialty and iggmc nagpur 
नागपूर

कुणी रक्त देता का रक्त; मेडिकल, मयोसह सुपर स्पेशालिटीत रक्ताचा तुटवडा

केवल जीवनतारे

नागपूर : वर्षभरापासून लॉकडाउनचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. गावखेड्यातून येणाऱ्या अत्याव्यस्थ रुग्णांवर कोणीतरी रक्त देता का रक्त? असे म्हणण्याची पाळी आली आहे. मेयो, मेडिकलसह सुपरमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा पसरला आहे. मेयो, मेडिकलमध्ये ए-निगेटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नाही, तर सुपर स्पेशालिटीत बी-निगेटिव्ह आणि एबी निगेटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

येत्या काही दिवसात स्वेच्छा रक्तदानाचा टक्का न वाढल्यास मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्थिती बिघडून त्याचा फटका रुग्णांना बसणार आहे. विशेष असे की, शस्त्रक्रियांनाही थांबा लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे मेडिकल, सुपरमधील रक्त युनिट शिल्लक नसल्याची माहिती पुढे आली आहे. रक्ताच्या तुटवड्यासंदर्भात मेडिकलच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते व मेयोतील विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बलवंत कोवे यांनी मात्र बोलण्यास नकार दिला. 

रक्त पिशव्यांची स्थिती - 

मेडिकल - रक्ताच्या केवळ ८१ पिशव्या उपलब्ध आहेत. यातही ओ-पॉझिटिव्ह गटाचे ७० युनिट आहेत. इतर रक्तगटाचे बोटावर मोजण्याइतके रक्ताच्या पिशव्या आहेत. मेडिकलमध्ये ७ जणांनी रक्तदान केले असून ३१ जणांना रक्त दिले. 

मेयो - रक्ताच्या केवळ ८८ पिशव्या उपलब्ध आहेत.यात ओ-पॉझिटिव्ह गटाचे ५७ युनिट आहेत. उतर रक्तगटाच्या बोटावर मोजण्याइतक्या पिशव्या आहेत. ३ जणांनी बुधवारी रक्तदान केले असून ६ जणांना रक्त देण्यात आले. 

सुपर - सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ६० रक्त पिशव्या आहेत. यातील २३ पिशव्या ओ पॉझिटिव्ह गटाच्या आहेत. उर्वरित गटाचे रक्त बोटावर मोजण्याइतक्या बॉटल्स उपलब्ध आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT