The body of a leopard was found in North Umarkhed forest reserve 
नागपूर

मटकाझरी परिसरात गस्त घालत होते वनकर्मचारी; बाजूच्या शेतात नजर फिरताच बसला जबर धक्का

सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : प्रादेशिक वनविभागाच्या उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र उपवन क्षेत्र मटकाझरी, नियतक्षेत्र फुकेश्वर येथे शनिवारी (ता. १३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास मादा बिबट मृतावस्थेत आढळली. वनकर्मचारी व वनमजूर गस्त घालत असताना बिबट कच्चीमेट ते फुकेश्वर रस्त्याच्या बाजूला शेतात मृत अवस्थेत दिसून आला.

वन कर्मचाऱ्यांनी लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी नरेंद्र चांदेवार, ए. के. मडावी घटनास्थळी उपस्थित झाले. घटनेचा पंचनामा नोंदविण्यात आला आहे. बिबट्याच्या शरीरावर कुठल्याही खुणा दिसून आलेल्या नाहीत. मृत बिबटचे दात, नखं, मिशा, पंजे व इतर शरीराचे भाग सुस्थितीत आढळून आले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी यांची चमू उपस्थित झाल्यानंतर शवविच्छेदन सुरू करण्यात आले. शवविच्छेदनात शरीराच्या भागाचे नमुने घेण्यात आले व पंचनामा सील करण्यात आला. विच्छेदन प्रक्रिया झाल्यानंतर बिबट्यावर अंत्यविधी करण्यात आली. गावाच्या तीन ते चार किलोमीटरच्या परिघाची तपासणी करण्यात आली.

शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल
मृत बिबट हा मादा वर्गातील आहे. तो दीड वर्षांचा होता. त्याच्या अंगावर कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्याचे सर्व अवयव सुस्थितीत आहे. त्याच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडला असावा असे वाटत नाही. त्याला अनेक दिवसांपासून शिकार मिळाली नसावी. उपासमारीने मृत्यू किंवा काही दिवसांपूर्वी विषबाधा झालेली असावी. तसेच आजारपणामुळे मृत्यू झालेला असावा. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल.
- नरेंद्र चांदेवार,
सहायक वन संरक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT