How Pesticides Cause Neurological Damage: पिकांवरील कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा अनियंत्रित पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशिष्ट भागांत किडनी, यकृत निकामी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कर्करुग्णांची संख्याही वाढते आहे. कीटकनाशकांच्या संपर्कात दीर्घकाळ आल्यास मेंदूपेशींचे वयही घटण्याची शक्यता असल्याची माहिती डॉ. केतन चतूर्वेदी यांनी येथे दिली.
वैद्यकीय क्षेत्रात ‘हालचाल विकार’ ही नवी टर्मिनोलॉजी पुढे आली आहे. त्या अनुषंगाने मॅक्समध्ये ‘हालचाल विकार’ आणि ‘स्ट्रोक युनिट’ हे दोन नवीन विभाग सेवेत रुजू करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर डॉ. चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हालचाल विकार ही सामान्य समस्या आहे. मात्र, न्युनगंडामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
शिवाय ही जीवघेणी परिस्थिती नसल्याने अनेकदा व्यंग लपविले जाते. त्याचे प्रमाण वयोगटानुसार बदलते. विशिष्ट हालचाल विकारांचे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते. तर काही अनुवांशिक किंवा मेंदूला दुखापत झाल्याने होऊ शकतात, असेही डॉ. चतुर्वेदी म्हणाले. यावेळी मेंदूतज्ज्ञ डॉ. हुसेन भाटी, डॉ. निखील डोंगरे, डॉ. ललित महाजन, डॉ. संतोष तिवारी, डॉ. आदित्य अटल उपस्थित होते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार २०१२ ते २०१८ दरम्यान देशातील प्रमुख शहरांमध्ये १४ हजार ५६१ नवीन रुग्णांवर मूव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिकमध्ये उपचार झाले. यात ९ हजार ५७८ पुरुष आणि ४ हजार ९८३ महिलांचा समावेश होता. सामान्यतः या आजाराचे प्रमाण २० टक्के ते ३० टक्क्यांपर्यंत असू शकते. ५० ते ५९ वयोगटातील लोकांमध्ये १८.५५ टक्के तर ८० ते ८९ वयोगटातील लोकांमध्ये ५१.३ टक्केपर्यंत प्रमाण वाढते. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हालचाल विकारांचे प्रमाण समान असते.
मूव्हमेंट डिसऑर्डरमुळे शरीरावरील नियंत्रण सुटते. हात पाय थरथरू शकतात आणि बोलण्यात अडचण येऊ शकते. इच्छेनुसार काम करता येत नाही. प्रत्येक प्रकारच्या हालचालींवर याचा परिणाम होऊ शकतो. अनेक कारणांमुळे मूव्हमेंट डिसऑर्डर होऊ शकतो.
- डॉ. अभिषेक वानकर, हालचाल विकारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.