CBSE
CBSE sakal media
नागपूर

सीबीएसईच्या ‘टर्म १’ चा आज निकाल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या ‘टर्म-१’ परीक्षेचा निकाल आज शनिवारी जाहीर केला. सीबीएसईने दोन्ही वर्गाचे निकाल ऑनलाइन जाहीर न करता शाळांना गुणपत्रिका पाठविल्या आहेत. 'टर्म-१’ ची परीक्षा सीबीएसईने ‘ऑप्शनल’ पद्धतीने घेतली होती. त्याची उत्तरे ‘ओएमआर’ पद्धतीने दिली. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना होती.

शुक्रवारी सीबीएसईने दहावी-बारावी ‘टर्म-२’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर शनिवारी ‘टर्म-१’ परीक्षेचे गुण शाळेकडून जाहीर केले जाणार असल्याचे ट्विट केले. यानंतर विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये चौकशी करून गुणांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळणार नसून केवळ गुण स्वत:जवळ नोंदवून घ्यावे लागणार आहेत. यामागे विद्यार्थ्यांनी ‘टर्म-१’ मध्ये केलेल्या कामगिरीचाच आढावा घेता यावा हा हेतू आहे. ‘टर्म-२’ च्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक होणार आहे. दोन्ही टर्मच्या परीक्षेचे गुण, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षांचे मूल्यांकनांचा समावेश करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी दिली.

विद्यार्थी, पालकांत संताप

दोन्ही परीक्षांची तयारी एकाच वेळी करता येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दोन्ही परीक्षांचे पॅटर्न वेगवेगळे असल्यामुळे एकाच परीक्षेवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.

‘जेईई-सीबीएसई’ परीक्षा एकाच वेळी

बारावीची परीक्षा सुरू असताना ‘जेईई मेन’ परीक्षा होणार असल्याने लाखो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. ‘जेईई मेन्स’ परीक्षेची तारीख ८ दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १६ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत, तर दुसऱ्या टप्प्यात २४ मे ते २९ मे या कालावधीत परीक्षा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT