MAYO Hospital  sakal
नागपूर

MAYO Hospital : २४ तास प्रयोगशाळा, दररोज ५०० रुग्णांच्या चाचण्या ; मेयोत सर्जिकल विंगमध्ये सेंट्रल क्लिनिकल लॅब, रुग्णांना दिलासा

भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषानुसार मेयो रुग्णालयात सुरू झालेली सेंट्रल क्लिनिकल लॅबोरेटरी (मध्यवर्ती प्रयोगशाळा) रुग्णांसाठी त्रासदायक ठरत होती.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषानुसार मेयो रुग्णालयात सुरू झालेली सेंट्रल क्लिनिकल लॅबोरेटरी (मध्यवर्ती प्रयोगशाळा) रुग्णांसाठी त्रासदायक ठरत होती. ही बाब ‘सकाळ’ने प्रकाशात आणल्यानंतर अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी पुढाकार घेत सर्जिकल विंगमध्ये ही प्रयोगशाळा उभारली. प्रयोगशाळा २४ तास उपलब्ध राहात असल्याने दररोज ५०० ते ७०० रुग्णांना लाभ मिळत आहे.

लॅब मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात दुसऱ्या माळ्यावर प्रयोगशाळा होती. मात्र रुग्णांसाठी ती गैरसोयीची ठरत होती. या प्रयोगशाळेत सर्जिकल कॉम्प्लेक्समधून चाचणीसाठी नमुने पाठविताना पाऊण किलोमीटर जावे लागत होते. रात्री बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने अंधारही असायचा. ही बाब ‘सकाळ’ने प्रकाशित केल्यानंतर सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर ही प्रयोगशाळा हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेयोत ही प्रयोगशाळा तयार करताना भविष्याचा विचार न करता तात्पुरता विचार करण्यात आला. त्यामुळे नमुने घेऊन निवासी डॉक्टरांना चकरा माराव्या लागत होत्या. सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये प्रयोगशाळा आल्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजीसह युरॉलॉजी व इतरही चाचण्या एकाच छताखाली होत आहेत. या प्रयोगशाळेमुळे रुग्णहित जोपासले जात आहे.

मेयोच्या आंतररुग्ण विभागात भरती रुग्ण आणि नियोजित शल्यक्रियांची गरज यानुसार रुग्णांच्या नियमित चाचण्या होत आहेत. बहुतांश चाचण्या रक्त, मुत्राशी निगडित असतात. ही प्रयोगशाळा सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरच स्थलांतरित झाल्याने रुग्णांना तत्काळ चाचण्यांचे अहवाल मिळतात.

- डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT