Dr. Jotsna Meshram e sakal
नागपूर

रसायनशास्त्र विभाग प्रमुखांची आत्महत्या, पतीच्या मृत्यूनंतर होता मानसिक तणाव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur university) रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (chemistry department head Dr. jostna meshram) यांनी सोमवारी पहाटे मनीषनगर येथील ‘जयंती मेन्शन-७‘ येथील नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्या ५६ वर्षाच्या होत्या. माजी कुलगुरु दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत्या. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते.

डॉ. प्रा. ज्योत्स्ना मेश्राम या जयताळा येथील अष्टविनायकनगरात राहत होत्या. त्यांना एक मुलगा आहे. तो अमेरिकेत राहतो. त्या मुलाकडे गेल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच त्या परत आल्या. जयंती मेन्शन-७ मध्ये त्यांची मावशी राहते. रविवारी (ता.२२) राखी असल्याने त्या मावशीकडे आल्या होत्या. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ९ व्या माळ्यावरून किचनच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पती जळगाव येथील कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांचा सहा महिन्यांपूर्वी दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात होत्या. तसेच त्या विभागप्रमुख असल्याने ‘नॅक'ची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. २ सप्टेंबरला विद्यापीठात नॅक कमिटी तपासणीसाठी येणार होती. त्यामुळेही त्या तणावात असल्याचे सांगितले जाते. विनय राजाराम खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्‍मात मृत्यूची नोंद केली आहे. हसतमुख आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व ही त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाने विद्यापीठात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उद्या मंगळवारी (ता.२४) सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT