हिरवी मिर्ची (Green Chilies)- तिखट  esakal
नागपूर

मिरची झाली तिखट; कच्चे आंबे आले बाजारात

इतर भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत

राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर: अवेळी आलेल्या पावसामुळे मिरचीच्या पिकावर रोग आला आहे. त्यामुळे मिरचीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भावात विक्रमी वाढ झालेली आहे. येत्या काळात त्यात अजून भाव वाढ होण्याची शक्यता आहे. आज हिरवी मिरची ठोक बाजारात ७० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १४० रुपये किलोने विकल्या जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून कच्चे आंबे बाजारात येऊ लागले आहे. त्यामुळे भाव चढे आहे.

इतर भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. मिरचीची आवक कमी झाली असल्याने मागणी वाढली आणि भाव वधारले आहेत. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावले आहेत. सर्वच भाज्यांचे भाव ठोक बाजारात २० ते ६० रुपये किलोवर पोचलेले आहेत. सामान्यांचे बजेट बिघडले आहे. ढेमसे आणि फणसाचे भाव आकाशाला भिडलेले आहेत असे ठोक भाजी विक्रेते राम महाजन यांनी सांगितले.

भाजीपाला ठोक भाव

  • वांगे - १५ रुपये किलो

  • फुलकोबी २० रुपये किलो

  • पानकोबी - १५ रुपये किलो

  • वाल -३० रुपये

  • टोमॅटो - २० रुपये

  • मेथी - २५ रुपये किलो

  • कोथिंबीर- २० रुपये किलो

  • शिमला मिरची - ५० रुपये किलो

  • हिरवी मिरची ७० रुपये किलो

  • पालक - १० रुपये किलो

  • भेंडी - ५० रुपये किलो

  • तोंडळे - ३० रुपये किलो

  • कोहळे - २० रुपये किलो

  • दुधी भोपळा - १५ रुपये किलो

  • हिरवा वटाणा - ३० रुपये किलो

  • मुळा - २० रुपये किलो

  • काकडी - १५ रुपये किलो

  • गाजर ः २० रुपये किलो

  • ठेमस - ५० रुपये किलो

  • कारले - ४० रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

SCROLL FOR NEXT