CM Eknath Shinde On RSS opposing maharashtra caste census in reshimbagh nagpur politics news  Sakal
नागपूर

Eknath Shinde : 'हा पुरोगामी महाराष्ट्र आहे...'; जातीनिहाय जनगणनेला संघाच्या विरोधावर रेशीमबागेत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले

रोहित कणसे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीभवनाला भेट दिली. यावळी जातीनिहाय जनगणनेला संघाकडून होत असलेल्या विरोधबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.

नागपूरात सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यादरम्यान नागपूरातील रेशीम बाग येथील आरएसएसच्या मुख्यालयाला एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. एकनाथ शिंदे म्हणाले की, दर हिवाळी अधिवेशनात, जेव्हा अधिवेशन नागपुरात असतं तेव्हा आम्ही सरसंघचालक हेडगेवार स्मारक समितीला भेट देत असतो आणि हेडगेवारांचं श्रद्धेने दर्शन घेतो. इथं आल्यानंतर उर्जा आणि प्रेरणा मिळते त्यासाठी आम्ही इथं येतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जातीनिहाय जनगणनेला विरोध करण्यात आला आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, या राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. इथे सर्व जातीपातींचे लोक सोबत राहतात, काम करतात आणि सण साजरे करतात. सर्वजण आनंदाने राहतात त्यामुळे राज्यात जातीय सलोखा, कायदेव्यवस्था बिघडू नये असा आमचा प्रयत्न राहतो.

सर्व समाजाचे मत घेतल्यानंतर सर्व समाजाचे हित लक्षात घेऊन जो योग्य निर्णय असेल तो घेतला जाईल, कारण हे जनतेचं सरकार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यापूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होणाऱ्या राजकारणाविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊनच सरकार स्थापन केलं आहे. आमचं हिंदुत्व हे विकासाचं हिंदुत्व आहे आणि पंतप्रधान मोदी देखील सगळ्यांना सोबत घेऊ विकास करायचा असल्याचे म्हणतात. सर्वांना सोबत घेऊन राज्याचा सर्वांगिण विकास व्हावा हेच आमच्या सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. सर्वसामान्या माणूस देखील कधीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. उपलब्धता हा आमच्या सरकारचा महत्वाचा मुद्दा आहे.

मी देखील सामान्य माणसाप्रमाणेच काम करतो म्हणूनच मला आणि आमच्या सरकारला लोकांचा पाठिंबा मिळत आहेत. राज्यात सध्या जे विकासाचं काम सरकार करत आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेली कामे महाविकास आघाडीच्या काळात थांबवण्यात आले, आमचे सरकार आल्यावर ती कामे तत्काळ सुरु करण्यात आले. याचा राज्यातील जनतेला फायदा होईल असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT