Commissioner Mundhe, Mayor Joshi come face to face today?
Commissioner Mundhe, Mayor Joshi come face to face today? 
नागपूर

आयुक्त मुंढे, महापौर जोशी आज कुठे येणार आमने-सामने ?

राजेश प्रायकर

नागपूर : स्मार्ट सिटी सीईओपदावरून आरोपांच्या फैरी झडल्यानंतर उद्या, आयुक्त व महापौरांचा संचालक मंडळाच्या बैठकीत सामना होणार आहे. पोलिस तक्रारीसह विविध आरोपांच्या माध्यमातून महापौरांनी आयुक्तांवर, तर आयुक्तांनी स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेसी यांच्या पत्राचा हवाला देत महापौरांवर कुरघोडी केली. संचालक मंडळाच्या बैठकीनिमित्त दोघेही आमने-सामने येणार असून एकमेकांवर थेट कुरघोडीची संधी आहे.  

महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटी सीईओपदावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केले. त्यांच्याविरोधात नियमबाह्यरीत्या सीईओपद बळकावून कंत्राटदारांना पैसे दिल्याचा आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून महापौर व आयुक्तांचा वाद नागपूरकरांतही चांगलाच चर्चिला गेला.

स्मार्ट सिटी सीईओपदी घेतलेल्या आयुक्तांच्या प्रत्येक निर्णयावर महापौरांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले. नियमाने वागणारे मुंढे स्मार्ट सिटीबाबत नियमबाह्य का वागतात, असा सवाल महापौरांनी केला. उद्या, स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सीईओपदी नियुक्तीचाही प्रस्ताव आहे.

यातूनच आयुक्त तुकाराम मुंढे यांची स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती झाली नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेसी यांनी सीईओपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे मौखिक सांगितल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर संचालक मंडळाची बैठक चांगलीच वादळी ठरण्याचे संकेत महापौर संदीप जोशी यांनी इतर संचालकांना नोटीस पाठवून दिले. 

 
नागपूरकरांतही उत्सुकता 
संचालक मंडळाच्या 14 सदस्यांपैकी आयुक्तांच्या समर्थनात किती पुढे येतात, महापौर संदीप जोशी उद्या काय भूमिका घेतात, याबाबत नागपूरकरांतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नियमानुसार सीईओपदी नियुक्ती नसताना आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबाबत बैठकीत नेमके काय होईल, या प्रश्‍नाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT