Congress marches on ED office Sakal
नागपूर

‘मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है`; काँग्रेसची ईडी कार्यालयावर धडक

पालकमंत्री नितीन राऊत, आमदार विकारे यांच्यासह प्रमुख नेते ताब्यात

राजेश चरपे

नागपूर - सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना नोटीस पाठवल्याने आज काँग्रेसच्यावतीने थेट ईडी कार्यालयासमोरच जोरदार आंदोलन केले. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता दिसताच पालकमंत्री नितीन राऊत, आमदार विकारे यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोमवारी दुपारी बारा वाजता विदर्भातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकले. आंदोलनाचे समन्वयक विकास ठाकरे आणि माजी मंत्री सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूला नितीन राऊत, ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितत निषेध सभा घेण्यात आली.

सुमारे दोन वाजताच्या सुमारास सर्वांनी एकत्रितपणे ईडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. ‘मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है` नरेंद्र मोदी मुर्दाबाद, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणांनी परिसर दनाणून गेला होता. ईडी कार्यालयापासून कार्यकर्त्यांना लांब ठेवण्यासाठी बॅरिकेड्‍स लावण्यात आले होते. ते तोडून कार्यकर्ते कार्यालयाच्या दिशेने जात असल्याने पोलिसांसोबत झकपक झाली. कोणी ऐकत नसल्याचे बघून पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेणे सुरू केले.

जेवढे दाबाल तेवढी ताकद दाखवू

भाजपच्यावतीने आम्हाला जेवढे दाबण्याचा प्रयत्न केला जाईल तेवाढी आम्ही आमची ताकद दाखवू. ईडीचा धाक दाखवून आमदारांना खरेदी केले जाऊ शकते मात्र कार्यकर्त्यांना नाही. इंदिरा गांधी यांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा देशात काय घडले याचा विचार करा, असा इशारा नितीन राऊत यांनी दिली.

विभाजनाचे षडयंत्र

विजय वडेट्‍टीवार म्हणाले, भाजप देशाच्या विभाजनाचे षडयंत्र रचत आहे. सत्तेचा वापर भाजप विरोधकांना संपवण्यासाठी करीत आहे.

पदाधिकाऱ्यांना इशारा

काँग्रेसचे आंदोलन असतानाही अनेक पदाधिकारी यात सहभागी झाले नाहीत. त्यांची यादी हायकमांडकडे पाठविली जाईल. तशी सूचनाही अ.भा. काँग्रेस कमेटीतून देण्यात आली आहे. ज्यांना वारंवार काँग्रेसने उमेदवारी दिली, मोठ्‍या पदे दिली. मात्र त्यानंतरही पक्षाच्या कार्यक्रमात सहभाही झाले नसलेल्यांची नावसह यादी पाठवण्यात येईल, असे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT