Nitin Raut sakal
नागपूर

काँग्रेसच्या रडारवर माजी पालकमंत्री!

कॉंग्रेसमध्ये दोन गटात धुमश्‍चक्री

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राज्यात सुमारे अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही. साधे दंडाधिकाऱ्यांचे पदही देण्यात आले नाही, असे सांगून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या कारभारावर चांगलाच रोष व्यक्त केला.

शहर काँग्रेसच्या कार्यकारिणीती बैठक शनिवारी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत देवडिया भवन येथे पार पडली. विवेक निकोसे यांनी काँग्रेसचे मंत्री कोणालाही भेटत नव्हते असा आरोप केला. राज्यात सत्ता असल्याने पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाला मोठे करण्याची चांगली संधी उपलब्ध होती. मात्र माजी पालकमंत्र्यांनी कोणालाच समित्या दिल्या नाहीत आणि पक्षाला सक्रिय करण्यासाठी काहीच केले नसल्याचे सांगितले. किशोर गीद यांनी क्रियाशील कार्यकर्त्यांना वगळून निष्क्रिय कार्यकर्त्यांची जिल्हानियोजन, संजय गांधी, महावितरण समित्यांवर नियुक्त्या केल्याचे सांगितले.

विकास ठाकरे पुन्हा अध्यक्ष

काँग्रेसने शहर अध्यक्ष म्हणून आपल्या नावाने पत्र दिले आहे. त्यामुळे सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी शहर कार्यकारिणीची बैठक बोलावली. आम्ही सत्तेत असताना पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची कामे झाली नाहीत. हे सत्य आहे. कोणाला पदे देता आली नाही याची खंत असल्याचे विकास ठाकरे व्यक्त केली. नवीन कार्यकारिणीत सक्रिय व दमदार कामगिरी करणाऱ्यांना स्थान दिले जाईल.

नागपूरचे डीआरओ सुनील कुमार व एपीआरओ दिनेश कुमार काही दिवसातच सविस्तर अहवाल प्रदेश कॉंग्रेसला सादर करणार आहे. त्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. बैठकीला प्रा.दिनेश बानाबाकोडे, दीपक वानखेडे, डाॅ.गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, अण्णाजी राउत, विक्रम पलकुले, संजय भिलकर, जॉन थॉमस, संदेश सिंगलकर, वीना बेलगे, रमण पैगवार, विवेक निकोसे,आशिश दीक्षित, महिला अध्यक्ष नैश अली, डॉ.सुधीर आघाव, विलास भालेकर, किशोर उमाठे, दर्शनी धवड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT