file photo
file photo 
नागपूर

नागपुरात वेगाने वाढताहेत प्रतिबंधित क्षेत्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूरः शहरात कोरोना प्रादुर्भावाने विविध भागांत पाय पसरले आहे. त्यामुळे महापालिकेला दररोज प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करावी लागत आहे. आज डिप्टी सिग्नल, जुनी सोमवारीपेठ आणि अवधूतनगरातील ओम आदर्शनीय को ऑपरेटिव्ह सोसायटीचा परिसर सील केला.
लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग 24 मधील डिप्टी सिग्नल येथील नागराज चौक परिसरात कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे नागराज चौकाच्या उत्तरेस राजू काटेकर यांचे घर ते गोवर्धन डेकोरेशन, पूर्वेस गोवर्धन डेकोरेशन ते नागराज मंदिर चौक, नागराज मंदिर चौक ते सुरेश शाहू यांचे घर, पश्‍चिमेस सुरेश शाहू यांचे घर ते राजू काटेकर यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

 हनुमाननगर झोनअंतर्गत प्रभाग 34 मधील अवधूतनगरातील ओम आदर्शनीय को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचा पूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. याच झोनअंतर्गत प्रभाक 31 मधील जुनी सोमवारीपेठ येथील बौद्ध विहाराजवळ पश्‍चिमेस बंसोड ते गजभिये यांचे घर, उत्तरेस गजभिये ते कुंभलवार यांचे घर, कुंभलवार ते अनिता खोब्रागडे यांचे घर, पश्‍चिमेस अनिता खोब्रागडे ते बन्सोड यांचे घरापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले.

मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग एकमधील आहुजानगराच्या उत्तर पूर्वेस हिरालाल ढोलवानी यांचे घर, दक्षिण पूर्वेस विजय अडवानी यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस हेमंत तेजवानी यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस वसंत घोरे यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला. नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग 27 मधील हसनबाग गल्ली क्रमांक पाच येथील पश्‍चिमेस अलबिलाल हॉटेल, पूर्वेस मोहम्मद इस्माईल अब्दुल मजीद यांचे घर, दक्षिण पूर्वेस शेख इसाहक यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस महाराष्ट्र मेडिकल स्टोर्सपर्यंतचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला. याच प्रभागातील बापूनगर उत्तर पूर्वेस राजेंद्र वाटाणे यांचे घर, दक्षिणेस ए. जी. पोहरे यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस अनिल केशवार यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस शांताबाई मोहोड यांचे घरापर्यंत निर्बंध लावण्यात आले. याच झोनमधील प्रभाग 30 मधील ताज कॉलनीतील उत्तरेस सय्यद रिजावान यांचे घर, पूर्वेस मतीन अहमद खान, दक्षिणेस अब्दुल जमील, पश्‍चिमेस शाहीन खान यांचे घरापर्यंतचा परिसर सिल करण्यात आला. गांधीबाग झोन प्रभाग 22 मधील भुजाडे मोहल्ल्याच्या उत्तरेस ढोबळे पीठ गिरणी, पूर्वेस हरिहर खवास यांचे घर, दक्षिणेस महादेव पराते यांचे घर, पश्‍चिमेस रामदास लाकडे यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला.
... संपादनः अनिल यादव..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT