Corona infection in two people in Nagpur 
नागपूर

तिघांनी एकाच 'चिलम'द्वारे केली नशा, एकाचा मृत्यू तर दोघे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दक्षिण नागपुरात तीन दिवसांपूर्वी 22 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या मृताकडून इतर दोघांना बाधा झाली. मृतासह बाधितांनी एकाच चिलममधून नशा केली होती. यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्‍टरांनी केलेल्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. यामुळे टाळेबंदीत अनधिकृतरीत्या सामूहिक व्यसनातून कोरोनाचा संसर्ग सहज होऊ शकतो, असे स्पष्ट करताना काही तज्ज्ञांनी शोध घेतल्यानंतर ही माहिती पुढे आल्याचे दिसून आले. 

उपराजधानीतील युवकाची प्रकृती खालवल्यावर त्याला तातडीने सहा मे रोजी मेडिकलमध्ये हलवले. परंतु, आकस्मिक विभागातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याचे शव शवागारात ठेवले. मात्र, नातेवाइकांच्या सांगण्यावरून डॉक्‍टरांनी त्याच्या घशातील द्रव्याचे नमुने घेतले. विशेष असे की, त्याच्या घशातील नमुने हे शवागारात जाऊन घेण्यात आले. ते नमुने तपासले असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे 7 मे रोजी प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले.

या तरुणाच्या संपर्कातील आलेला जयभीमनगर आणि रामेश्वरीचा प्रत्येकी 25 आणि 28 वर्षीय युवक मेडिकलमध्ये दाखल झाले. त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. या विषाणूच्या संक्रमणाची साखळी जोडण्यासंदर्भातील संशोधन सामाजिक औषधशास्त्र विभाग (पीएसएम) तज्ज्ञांकडून सुरू झाले. मृत तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या दोघे अशा तिघांनाही गांजा ओढण्याचे व्यसन असल्याचे प्राथमिकदृष्ट्या उपचारादरम्यान पुढे आले. 

तिघेही एकाच चिलमीतून व्यसन करीत असल्याने त्यांच्या फुप्फुसात या विषाणूचे गंभीर संक्रमण झाले आहे. यातूनच पार्वतीनगरच्या युवकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. ही माहिती महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या कानावरही घालण्यात आली. त्याबाबत आणखी माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

अशा व्यसनामुळे जीविताला धोका

या घटनेमुळे टाळेबंदीतही अनधिकृतपणे व्यसनाधीनांची प्रकरणे पुढे येत आहेत. यामुळे हॉटस्पॉट असलेल्या भागातील व्यसनामुळे साखळी तयार झाली की, काय अशी भीती व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे व्यसन केल्याने जीविताला धोका संभावतो, असे सूत्रांनी सांगितले. या विषयावर मेडिकलसह महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु अधिकारी बोलण्यास तयार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT