The corona report positive without testing 
नागपूर

हृदयात झाले धस्स! ‘अहो, मी फक्त भेट देऊन गेलो', तरी... वाचा निष्काळजीपणाचा कळस

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना आणीबाणीच्या काळात माणसातील माणुसकी हिरावली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीला अस्पृश्यासारख्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली अनेकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. खासगी रुग्णालयांनी कोरोना नसतानाही रुग्णांना आपन कोरोनाबाघित असल्याचे दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेकांना रुग्णालयात जायलासुद्घा भीती वाटते. असाच एक प्रकार समोर आला आहे.

वानाडोंगरी येथील तपासणी केंद्रात एक व्यावसायिक गेला. या व्यवसायिकाला काही प्रमाणात कोरोनासदृश्य लक्षणे होती. यामुळे तपासणीसाठी सकाळी-सकाळी केंद्रात गेला होता. मात्र, येथील डॉक्टरांनी ‘दुपारी दोन वाजता या, तुमचे नमुने घेण्यात येतील', असे सांगितले. यामुळे हा व्यवसायिक घरी परतला. यावेळी त्याने नावाची नोंद केली होती. हा व्यावसायिक दुपारी काही महत्त्वाचे काम असल्याने तपासणीसाठी पोहोचला नाही.

मात्र, वानाडोंगरी येथील अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता त्यांना केंद्रातून फोन केला. हॅलो... मी वानाडोंगरी तपासणी केंद्रातून बोलयोय... तुमचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे... हे शब्द कानावर पडताच समोरची व्यक्ती धास्तावली. परंतु, स्वतःला सावरत म्हणाला, ‘अहो, मी फक्त वानाडोंगरी तपासणी केंद्रात आलो. तुम्ही तपासणीच केली नाही. दुपारी बोलावलं... मला कसा कोरोना होईल...' असा प्रतीप्रश्न केला. काही वेळानंतर झालेली चूक सुधारण्यात आली.

सदस्यांसह गाठले केंद्र

कोरोना असल्याचा संदेश मोबाईवर मिळताच या व्यावसायिक व्यक्तीने स्वतःला सावरले. तातडीने ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क साधून केंद्र गाठले. केंद्रात पोहोचल्यानंतर तपासणी न करता कोरोना कसा होऊ शकतो, असा सवाल केला. तसेच कोरोनाचा अहवाल द्या अशी विचारण केल्यानंतर चूक लक्षात आली. अधिकाऱ्यांनी ही चूक दुरुस्त केली.

सल्ला देत निघूग गेले सदस्य

कोरोना केंद्रावरील कर्मचाऱ्याने मोबाईलवर संपर्क साधत ‘तुमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे' असे सांगितले. यामुळे या व्यक्तीच्या हृदयात धस्स झाले. आता तुम्हीच सांगा, तपासणी न करता बिच्चाऱ्या त्या व्यक्तीला केवळ तपासणी केंद्राला भेट दिल्यामुळे कोरोनाबाधित बनवले. असा घोळ कोणाच्या जीवावर बेतू शकते. यामुळे काळजी घ्यावी, असा सल्ला अधिकाऱ्यांना देत सदस्य निघून गेले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT