मास्क असतो हनुवटीवर! sakal
नागपूर

जनता आता भयमुक्त; मास्क असतो हनुवटीवर!

वेध संस्थेच्या कार्यकर्त्याचा पाहणी अहवाल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर आता जनता भयमुक्त झाली असून काही दिवसांपूर्वी तोंडावरचा मास्क हनुवटीवर आला आहे. आता सारे व्यवहार सामान्य होत असल्याचे चित्र दिसत असताना जनता ‘मास्क मुक्त’ झाली आहे. प्रतिपिंड तयार झाल्याचे सांगण्यात येत असून आता भयाचा धोका उरला नसल्याचे सर्रास बोलले जात आहे. डॉक्टर, पोलिस असो की, सामान्य जनता, साऱ्यांचे मास्क हनुवटीवर दिसतात. १५ ते २० टक्के लोकं मास्क घालत असल्याचे वेध या संस्थेने केलेल्या पाहणीतून पुढे आले.

पहिल्या लाटेत कोरोनाची दहशत प्रचंड होती, यामुळे प्रत्येक जण मास्क घालत होता. ज्यांनी मास्क घातला नाही, अशा व्यक्तींकडून चक्क दंड वसुलीही करण्यात आली. दुसऱ्या लाटेतही हाच अनुभव आला. साऱ्यांच्या मुखावर मास्क दिसत होता. मात्र तरीदेखील मोठी हानी झाली. नागपूर जिल्ह्यात चक्क ५ लाख ७७ हजार ७०५ जणांना कोरोना झाल्याची नोंद आहे. यावर मात करणाऱ्यांची संख्या ५ लाख ६७ हजार ३२९ आहे. मात्र या दोन वर्षात १० हजार ३३७ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. मास्क आताही घालायचा आहे.

काही निरीक्षण...

रुग्णालयात रुग्ण मास्क शिवाय

अनेक दुकानांमध्ये मास्क शिवाय एन्ट्री

चौकात तैनात पोलिसांचाही मास्क आला हनुवटीवर

मुलं मैदानात क्रिकेट खेळत असताना मास्क दिसत नाही.

काही डॉक्टरांनी मास्क घालणे सोडले आहे

चहा टपरीवर ग्राहकांच्या तोंडावर दिसत नाही मास्क

रेल्वे, बस स्थानकावर मास्क दिसत नाही

मास्क आढळले

 रुग्णालयात परिचारिका मास्क घालून दिसतात

 मॉलमध्ये मास्कशिवाय प्रवेश नसल्याने प्रत्येकाच्या तोंडावर मास्क

 रुग्णालयातही प्रत्येकजण मास्क घालून दिसले

मास्क जीवनाचा अविभाज्य भाग

कोरोना ओसरला, आता मास्क लावल्यामुळे त्रास होतो असं म्हणतं काही लोक मास्क लावणं टाळतात. बराच वेळ मास्क घातल्याने काही लोकांना श्वसनाच्या समस्या येत आहेत, हे खरे असले तरी, घरातून बाहेर पडताच मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे.येणाऱ्या वर्षभरापुरते मास्क आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला तरी चालेल असे मत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT