corona 
नागपूर

Corona Update : कोरोनाच्या मृत्यूंची त्सुनामी; एकाच दिवशी ७९ कोरोनाबळी, ६ हजार ९५६ नवे बाधित

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : दर दिवसाला जिल्ह्यात कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाच्या विक्रमी संख्येने आता नागपुरकरांच्या ह्दयाचा ठोका चुकण्याची वेळ आली आहे. मागील २४ तासांमध्ये ७९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर नव्याने ६ हजार ९५६ बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १५ हजारावर ९९९कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर यापैकी ६ हजार १८८ जणांचे बळी आतापर्यंत गेले आहेत. जिल्ह्यात सद्या ६६ हजार २०८ जण कोरोनाबाधित आहेत. यापैकी गृहविलगीकरणात ५१ हजार २१३ बाधित आहेत.

जिल्ह्यात आता समुह संसर्ग झाला आहे. यामुळे कोरोना अधिक वेगाने वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्णाला खाटा मिळत नसल्याचे विदारक वास्तव नजरेपुढे असताना प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाग्रस्तांची वाढलेल्या संख्येवर रोखताना तीन फॅक्टर महत्त्वाचे ठरले होते. त्यात जास्तीत जास्त टेस्ट, घरोघरी जावून लोकांची तपासणी आणि संशयित लोकांचं रुग्णालय किंवा क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये विलगीकरण, मात्र नागपूर महापालिकेने यातील एकाही गोष्टीकडे लक्ष दिले नाही.

केवळ चाचणीची संख्या वाढवली, मात्र बाधितांसाठी सोयी सुविधा तयार न करता गृहवलिगकरणीवरच भर दिला, यामुळेच रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. आज पुन्हा २९ हजार ५३ चाचण्याचा उच्चांक तयार केला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २० लाखाच्या उंबरठ्यावर चाचण्यांची संख्या पोहचली आहे. यातील साडेतेरा लाख चाचण्या या आरटीपीसीआर आहेत, तर उर्वरीत सव्वासहा लाख चाचण्या रॅपिड ॲन्टिजेन आहेत. शहरात ४० हजार १०० सक्रिय रुग्ण आहेत. तर ग्रामीण मध्ये २६ हजार १०८ कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावरील उपचाराची कोणतीही सोय प्रशासनाकडून होत नाही. शहरातील महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरली आहे.

एम्समध्ये केवळ ९६ रुग्ण

मेडिकलमध्ये सद्या ८९४ कोरोनाबाधित उपचारासाठी दाखल करण्यात आली आहेत. यातील अडिचशे रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. तर ११० पेक्षा अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. हीच स्थिती मेयोतही आहे. मेयो रुग्णालयात ५६५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र एम्समध्ये खाटा वाढवण्यात आल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात येत आहे, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २०० खाटा तयार असल्याच्या घोषणा करण्यात येत आहेत, मात्र येथे रुग्ण गेला असता, त्याला परत पाठवण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाकडून फसवेगिरी करण्यात येत असल्याची टिका स्वंयसेवी संघटनांकडून करण्यात येत आहे. सद्या ७ हजार ८३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT