Corona vaccine test list prepared in Nagpur
Corona vaccine test list prepared in Nagpur 
नागपूर

फक्‍त आदेशाची प्रतीक्षा... नागपुरातील तीस जण कोरोना लसीच्या चाचणीसाठी तयार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना लस चाचणीसाठी नागपुरातील डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालयाला परवानगी मिळाली आहे. मंगळवारपासून कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवातही होणार होती. परंतु, सुरुवातीला शासकीय रुग्णालयातून सुरुवात करण्यात येणार आहे. दिल्लीतील एम्समध्ये पहिल्या टप्प्यात सुरुवात होईल. नागपुरातील 18 ते 55 वयोगटातील 30 निरोगी व्यक्तींची यादी तयार आहे. लस चाचणीचे आदेश मिळाल्यानंतर लगेच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस किंवा प्रतिबंधक औषधांची साऱ्यांनाच प्रतीक्षा आहे. सारे जग लस तयार करीत आहे. जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधासाठी न्यूझीलंडमध्ये प्राण्यांवर चाचणी करण्यात आली. ती यशस्वी झाल्यामुळे लसीची मानवी चाचणी करण्यात येत आहे.

देशभरातील 12 ठिकाणी ही चाचणी होणार आहे. सुरुवातीला दिल्लीतील एम्ससह इतर सरकारी रुग्णालयात ही चाचणी करण्यात येईल. यानंतर खासगी संस्थांमध्ये सुरुवात होणार आहे. नागपुरातील चाचणी चार दिवसानंतर सुरुवात करण्यात येईल, अशी शक्‍यता डॉ. गिल्लूरकर यांनी व्यक्त केली. 

कोरोना नियंत्रणासाठी कोणतेही औषध नाही. यामुळे लस किंवा औषध लवकर यावे असे साऱ्यांनाच वाटत आहे. यामुळेच संशोधन संस्थांच्या संसोधनाला वेग येत आहे. काही औषधांसह लसींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या "कोव्हॅक्‍स' या लसीची न्यूझीलंडमध्ये प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे.

चाचणीचे सकारात्मक परिणाम असल्याने नागपूरसह देशातील 12 ठिकाणी मानवी चाचणीला आयसीएमआरने परवानगी दिली आहे. नागपुरात डॉ. गिल्लूरकर यांच्या रुग्णालयात पहिल्या टप्प्यात 30 व्यक्तींवर चाचणी केली जाईल. यासाठी 30 व्यक्तींची यादी तयार आहे. यानंतरच दुसऱ्या टप्प्यात 60 व्यक्तींवर करण्यात येईल. 

12 केंद्रांवर लसीची मानवी चाचणी 
नागपुरात आपल्या हास्पिटलमध्ये परवानगी मिळाली. देशातील 12 केंद्रांवर लसीची मानवी चाचणी होणार आहे. सुरुवातीला शासकीय संस्थांमध्ये ही लस चाचणी करण्यात येणार आहे. यानंतर खासगी संस्थांमध्ये लस चाचणी सुरू होईल. दिल्ली, मुंबईतील सरकारी संस्थांमध्ये दोन दिवसांत चाचणी होण्याची शक्‍यता आहे. यानंतर आपल्याकडे तयार असलेल्या यादीतील व्यक्तींवर लस चाचणी होईल. 
- डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, 
संचालक, गिल्लूरकर मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT