Corona to the young man who  suicide
Corona to the young man who suicide 
नागपूर

आत्महत्या करणारा युवक  कोरोनाबाधित

केवल जीवनतारे


नागपूर : बुधवारी (ता.15) पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केलेला एका 30 वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला आहे. मेयोत झालेल्या चाचणीतून ही बाब पुढे आली. तर मेडिकलमध्ये 63 वर्षीय व्यक्ती कोरोनाच्या बाधेने दगावला. शहरात आज झालेल्या दोन मृत्यूने एकूण 41 मृत्यूंची नोंद झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 571 वर पोहोचला आहे. सध्या मेयो, मेडिकलसह कोविड सेंटरमध्ये 911 बाधितांवर उपचार सुरू आहेत.


नवीननगर, अन्नपूर्णा सोसायटीतील तिशीतील युवक लॉकडाउनमुळे बेरोजगार होता. तणावात त्याने हा गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा मृतदेह मेयो रुग्णालयात आणला. मृतदेहाची कोरोना चाचणी सक्तीची असल्याने तत्काळ चाचणी करण्यात आली. तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मेयो प्रयोगशाळेतून आला. हा युवक विवाहित आहे. लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने आर्थिक स्थिती खालावल्याने पत्नी आणि मुलांना माहेरी पाठवून दिले. काम मिळविण्यासाठी एक आठवड्यापासून भटकंती करीत होता. परंतु, काम मिळाले नाही. यामुळे अखेर आर्थिक विवंचनेतून या युवकाने आत्महत्या केली. दुपारी बाराच्या सुमारास घरी कुणीही नसताना अनिलने घराच्या लोखंडी हुकला गळफास लावून आत्महत्या केली. ज्या पोलिसांनी मेयोत मृतदेह आणला त्यांच्यासह संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

बुधवारीत मेडिकलमध्ये सकाळी दगावलेली कोरोनाबाधित 63 वर्षांची व्यक्ती मूळची यवतमाळ येथील रहिवासी आहे. ऍनलॉकच्या काळात ही व्यक्ती चंद्रपूर, वर्धा, नागपूर येथे सर्रास फिरत होती. या प्रवासादरम्यान बाधित झाल्यामुळे 14 जुलैला या व्यक्तीला मेडिकलच्या कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले. पोटाचा विकार असल्याचेही डॉक्‍टरांनी केलेल्या निदानातून पुढे आले. उपचार सुरू झाल्यानंतर12 तासांमध्येच त्याची प्रकृती खालावली.

15 दिवसांत 1 हजार 75 बाधित

1 ते 30 जून या महिनाभराच्या कालावधीत उपराजधानीत कोरोना विषाणूचे अवघे 963 रुग्ण वाढले. मात्र, 1 जुलैपासून कोरोनाच्या प्रसाराची गती वाढली आहे. 1 ते 15 जुलै या 15 दिवसात 1 हजार 75 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पंधरा दिवसात 16 जण दगावले आहेत. विशेष असे की, शहरातील झोपडपट्ट्यांपासून तर शहरातील विविध अपार्टमेंटमध्ये, शंभरपेक्षा अधिक वस्त्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनाने 500 रुग्ण झोपडपट्ट्यांमधील आहेत. कोरोनाबाधिताचा प्रादुर्भाव उपराजधानीसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरात रॅपिड चाचणीचा वापर होत असल्याने चार दिवसांमध्ये 8 हजार चाचण्यांचा विक्रम झाला आहे.

शहरातील हॉटस्पॉट

नाईक तलाव बांगलादेश : 413
मध्यवर्ती कारागृह ः 300
मोमिनपुरा : 266
सतंरजीपुरा : 120
टिमकी भानखेडा : 67

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT