नागपूर

नागपूर : जागनाथ बुधवारीत कॉस्मेटिक दुकानाला आग

राजेश प्रायकर

नागपूर : जागनाथ बुधवारी या वर्दळीच्या बाजारात बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत कॉस्मेटिक दुकानातील साहित्य जळाले. याशिवाय चप्पलचेही दुकान जळाले. दुकानमालकाला धूर दिसताच अग्निशमन विभागाला कळविल्यामुळे इतर दुकानांपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.

जागनाथ बुधवारीतील भारत माता चौकात नितीन तिडके यांचे एस. एस. एजेन्सीज नावाने कॉस्मेटिक, परफ्यूम, डिओचे दुकान आहे. दुकानाच्या वरच्या भागालाच तिडके यांचे वास्तव्य आहे. रात्री जेवणानंतर तिडके दुकानपुढील रस्त्यावर उभे होते. त्यांना दुकानातून धूर निघताना दिसला. त्यांनी व बहीण शिल्पा सोनवणे यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली.

गंजीपेठ, लकडगंज व कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातून तत्काळ अग्निशमन बंब जागनाथ बुधवारीत पोहोचले. अग्निशमन बंब येईस्तोवर आग दुकानात पसरली. अग्निशमन जवानांनी पोहोचताच आगीवर पाण्याचा मारा केला. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु, तिडके यांचे दोन लाखांचे परफ्यूम, डिओ, कॉस्मेटिक्स जळून राख झाले. कॉस्मेटिक्स असल्याने आग लवकरच पसरली. परंतु, तिडके यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळविल्यामुळे इतर दुकानांचे नुकसान टळले.

आणखी काही दुकानांपर्यंत आग पोहोचली असती तर पूर्ण दुकानांची राखरांगोळी झाली असती, असे तिडके यांंनी सांगितले. एवढेच नव्हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यही येथेच निवास करतात. तेही बचावले. एकूणच मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य फायरमॅन खालीद अंसारी यांच्या नेतृत्त्वात फायरमॅन नितीन वैद्य, प्रवीण झाडे, दुधीराम शेंडे, शेत्रपाल, गभणे यांनी आगीवर नियंत्रण आणले.

दारूच्या दुकानामुळे भीती

तिडके यांच्या मालकीची दुमजली इमारत असून ग्राऊंड फ्लोअरला दारूचे दुकान आहे. आगीवर लवकर नियंत्रण मिळवल्यामुळे दारूचे दुकान वाचले. परंतु आगीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास दारूमुळे आग आणखी भडकण्याची व घर जळण्याची भीती तिडके यांची बहीण शिल्पा सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Drug Price Cut: कॅन्सरच्या महागड्या औषधांबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमचा खर्च किती वाचणार? आता मिळू शकतो मोठा दिलासा!

VIRAT KOHLI RCB CAPTAINCY: विराट कोहलीला कॅप्टन्सीवरून हटवून मला कर्णधार करणार होते! पार्थिव पटेलचा RCB बाबत मोठा दावा

Numerology: सीक्रेट्स सांगण्याआधी १०० वेळा करा विचार; 'या' मूलांकांच्या व्यक्तींशी खाजगी गोष्टी शेअर करणे पडू शकते महाग! जाणून घ्या अंकशास्त्र...

World Post Day: काळ बदलला, संवादाचे माध्यम बदलले; तरी पोस्टमनकाकांची वाट अन् टपालावरील विश्वास कायम!

Maharashtra Live News : काही दिवसांत MPSCच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात चांगली बातमी येईल - राज ठाकरे

SCROLL FOR NEXT