Crime News sakal
नागपूर

Crime news : IPLची मॅच बघितली; नंतर झाडली डोक्यात गोळी

ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे

राजेश नागरे

कामठी : उशिरा रात्रीपर्यंत आयपीएलची मॅच बघितल्यानंतर कामठीतील एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आयुष अजय त्रिवेदी (२६) रा. बंगला नंबर १७, ऑरेंज सीटी, राज रॉयलजवळ, कामठी असे मृताचे नावे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आयुष त्रिवेदी हे सावनेर-कामठी परीसरात बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचे काम करीत होता. तो रेती व्यवसायात सक्रिय होता. त्यांच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड अशी वाहनेही आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयुष कर्ज बाजारीपणामुळे तणावात राहत होता. आयुषचे आई वडील आणि बहीण खाली तर आयुष पहिल्या माळ्यावर राहत होता. तो सोमवारी रात्री उशिरापर्यंत आयपीएलची फायनल पहात होता.

मंगळवारी सकाळी चहा-नाश्त्याची वेळ होऊनही तो खाली आला नाही. आतून दार बंद असल्याने त्याला कुटुंबियांनी फोन केले. मात्र प्रतिसाद आला नाही. म्हणून आईने त्याच्या खोलीत डोकावून बघितला असता तो बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने शेजारची मंडळी धावली.

रात्री उशिरापर्यंत आयपीएलची मॅच बघितली; नंतर डोक्यात गोळी झाडली

त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कामठी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. फॉरेन्सिकचेही पथक बोलवून घेण्यात आले. त्यांनी आयुषच्या रूमची बारकाईने तपासणी करून तेथून पिस्तुल तसेच त्याचा मोबाईल जप्त केला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आयुषने कर्जबाजारूपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद केली. मात्र, व्यवसाय चांगला चालत असताना आयुषवर कर्ज कशाचे झाले होते, ते उघड झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT