Pune Crime sakal
नागपूर

Crime news : बहिणीला आक्षेपार्ह मॅसेज करून फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाची भावाकडून हत्या

गिट्टीखदान परिसरातील घटना आरोपीचे आत्मसमर्पण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बहिणीला नको तसे मॅसेज पाठवून तिचे फोटो प्रसारित करणाऱ्या युवकाची भावाने काठीने वार करून हत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस हद्दीतील गंगानगर येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. कपिल भीमराव डोंगरे (३७) असे मृताचे तर राहुल बिसेन असे आरोपीचे नाव आहे.

राहुल हा बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्याकडे काम करतो. तर कपिल याची मोबाइल शॉपी आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल हा राहुलच्या बहिणीला नको तसे मॅसेज पाठवायचा. हे कळताच राहुल याने कपिलला अनेकदा समजाविले. तिचे फोटोही प्रसारित केले. मंगळवारी दुपारी कपिल हा त्याच्या दुकानात होता.

राहुल दुकानात गेला. दोघांमध्ये वाद झाला. कपिल याने राहुलला काठीने मारहाण केली. राहुलने त्याच्या हातातील काठी हिसकावली व कपिलच्या डोक्यावर वार केले. यात कपिलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राहुल याने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा गंगानगर येथे पोहोचला.

पंचनामा करून मृतदेह मेयोत पाठवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT