Nagpur Crime News sakal
नागपूर

Nagpur Crime News: दगडाने ठेचून पत्नीचा खून

भूखंडाचा वाद विकोपाला

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime News: भूखंडाचा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने चक्का पत्नीच्या डोक्यावर दगड हाणून खून केला. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवणगाव पुनर्वसन येथे मंगळवारी भरदुपारी घडली.

शैजा नागपुरे (५३) रा. साकेतनगरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर बाबाराव नागपुरे (५६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शैजा ही बाबारावची दुसरी पत्नी होती. पहिली पत्नी उमरी (समुद्रपूर) येथे तर दुसरी साकेतनगरी येथे राहात होती. बाबाराव दुसऱ्या पत्नीसोबत म्हणजे शैजा हिच्या सोबत राहायचा.

शिवणगाव पुनर्वसन येथे त्यांचा एक भूखंड आहे. शैजा सोबत संपत्तीवरून नेहमीच वाद व्हायचा. सततच्या भांडणाला कंटाळून बाबारावने घर सोडले आणि तो बाहेरच राहायचा. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा बाबारावने शिवणगाव येथील भूखंडावर झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी तो प्लॉटवर गेला. साफसफाई करीत असतानाच शैजा प्लॉटवर आली. यावेळी पती पत्नीत पुन्हा भूखंडावरून वाद झाला. वाद विकोपाला जाताच संतापलेल्या बाबारावने दगड उचलून शैजाच्या डोक्यात हाणला. ती रक्तबंबाळ होऊन कोसळली.

निपचित पडल्याचे पाहून बाबाराव घटनास्थळावरून पळून गेला. एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला तसेच आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT