mangesh kadav
mangesh kadav 
नागपूर

मंगेश कडवच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला व शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेला शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्या बॅंक खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याची  माहिती समोर आली आहे. गुन्हेशाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बॅंकेला या व्यवहारांचा तपशील मागितला आहे. व्यवहार उघड झाल्यास  राजकीय वर्तुळातील अनेकांच्या मागे पोलिसांचा ससेमीरा लागण्याची शक्‍यता आहे.

गुन्हेशाखा पोलिसांनी शुक्रवारी कडव याच्या भरतनगर येथील घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, घराचे दस्तऐवज, करारनामे, स्टॅम्पपेपर व अन्य दस्तऐवज जप्त केले. जप्त दस्तऐवजांची पोलिसांनी पाहणी केली असता दहा कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले. याशिवाय कडव याने चार ते पाच सौंदर्य प्रसाधनांच्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्याचेही उघड झाले आहे. त्याचाही तपास पोलिस करीत आहेत.

कडव याने आतापर्यंत 30 पेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे भूखंडाचे व्यवहार केले आहेत. या व्यक्तींच्या नावाची यादी गुन्हेशाखेने तयार केली असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहेत. चौकशीनंतर कडवकडून कुणी मलिदा लाटला याचाही शोध पोलिस घेणार आहेत.

मंगेश कडव ,त्याची पत्नी व सहकाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत सीताबर्डी, सक्करदरा, हुडकेश्वर, बजाजनगरमध्ये दोन व अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये एक असे एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरुद्ध आणखी आठ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचा तपास सुरू असून लवकरच कडव व त्याच्या साथीदारांविरुद्ध आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे. बजाजनगरमध्ये शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात मंगेशची पत्नी डॉ. रुचिका आरोपी आहे. त्यामुळे डॉ. रुचिकाला गुन्हे शाखा अटक करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT