file photo 
नागपूर

नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे; या धरणांचे उघडले दरवाजे

वसंत डामरे

रामटेक (नागपूर) : संततधार पावसामुळे तालुक्यातील तोतलाडोह धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले असून, ८६४ क्युसेक पाण्याचा पेंच नदीत विसर्ग सुरू आहे. पेंच धरणाचेदेखील १६ दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

तालुक्यात तोतलाडोह येथे महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर पेंच नदीवर मोठे धरण बांधण्यात आले आहे. सर्वप्रथम १४ ऑगस्टला तोतलाडोह धरणाचे २ दरवाजे उघडले होते. त्यानंतर क्रमशः १० व १४ उघडण्यात आलेले होते. नंतर काही दरवाजे बंद करण्यात आले. मध्य प्रदेशात चांगला पाऊस होत असल्याने मध्य प्रदेशातील याच नदीवरील चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तोतलाडोह धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आहे. 

हेही वाचा : डॉन का छुटना अब नामुमकिन है; संतोष आंबेकरला पुन्हा अटक

काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २८ ऑगस्ट रोजी जलसाठा ९७.३०३ टक्के झाल्याने धरणाचे पुन्हा १४ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे पेंच नदीला पुराचे स्वरूप आलेले आहे. ८६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, उपविभागीय अभियंता राजेश धोटे, उपविभागीय अभियंता नागदिवे, शाखा अभियंता अक्षय वाकडेकर यांनी पेंच व कन्हान नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

संपादन : मेघराज मेश्राम
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओ, बुलेट दिली, पैशांची मागणी वाढतच राहिली; पत्नीला जिवंत जाळलं, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

'जागल्या'चा खरा चेहरा उघड; खळबळजनक तपासात धक्कादायक माहिती समोर, धर्मस्थळ परिसरात फक्त दोन ठिकाणीच सापडले मानवी सांगाडे!

Maharashtra Tradition: लाखाहून अधिक बैलजोड्या गोरखनाथांच्या दरबारात; वसमत, मंदिराला घातल्या पाच प्रदक्षिणा, ४०० वर्षांची परंपरा

Nashik News : ३२१ कोटींच्या निधी वाटपावरून राजकारण तापले; लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे पाटलांची बीडच्या बाळाघाटावरून तोफ धडाणणार

SCROLL FOR NEXT