Daya Shetty will teach traffic rules to Nagpur people  
नागपूर

एका दणक्यात अख्खा दरवाजा तोडणारा 'दया' आता देणार वाहतूक नियम पाळण्याचा संदेश; कसा ते वाचा 

नरेंद्र चोरे

नागपूर : एका हिंदी वाहिनीवरील 'सीआयडी' या लोकप्रिय मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेला इन्स्पेक्टर दया उर्फ दयानंद शेट्टी आता नागपूरकरांना वाहतूक नियम पाळण्याचा संदेश देणार आहे. यासंदर्भात संदेश देणारी व्हीडिओ फिल्म तयार करण्यात येत असून, त्याद्वारे दया नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करणार आहे.

मूळ नागपूरचे आणि सीआयडी व सास भी कभी बहू थी फेम शैलेश आनीखिंडी दिग्दर्शित या चार मिनिटांच्या फिल्मचे चित्रीकरण गुरुवारी रात्री अजनी उड्डाणपूलाजवळ होणार असल्याची माहिती, जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी बोलताना दया म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून देशात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विविध शहरांमध्ये दररोज असंख्य निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. केवळ निरक्षरच नव्हे उच्चशिक्षित व्यक्तीही वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. ही देशवासींसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. 

वाहतुकीचे नियम तोडणे हा निश्चितच फार मोठा अपराध आहे. यासंदर्भात नियमितपणे जनजागृतीची तसेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे असून, व्हीडिओ फिल्मच्या माध्यमातून वाहनधारकांना चांगला संदेश जाईल, असे ते म्हणाले.५१ वर्षीय दया यांनी यावेळी जनआक्रोशच्या नागपुरातील सामाजिक कार्याची प्रशंसा केली.

जनआक्रोशतर्फे १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित रस्ता सुरक्षा महिन्यात जनजागृती करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला जनआक्रोशचे उपाध्यक्ष अशोक करंदीकर, उदय पानवलकर, आशीष नाईक, रवी हरिदास यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT