death body leopard 
नागपूर

नागपूर : उमरेडलगत आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह

मकरधोकडा मार्गावरील घटना, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

उमरेड : शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मकरधोकडा मार्गालगतच्या शिवारात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून व्याघ्रप्रेमी वाघाचे दर्शन घ्यायला निकटच्या कऱ्हांडला अभयारण्यात जातात. वाघाचा मृतदेह शहरालगतच पडून असल्याची वार्ता कळताच बघ्यांची गर्दी उसळली.

वाघाच्या अंगावर काही जखमा असून त्याचे शरीर अंशतः रक्ताने माखले आहे. यावरून लगतच्या मार्गावर त्याचा अपघात झाला असावा किंवा दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मृत्यूचे प्राथमिक कारण उद्या सोमवारी शवविच्छेदनानंतरच कळेल. वाघाचा व्हिसेरा चाचणीसाठी पाठविल्यानंतर त्यांचा अहवाल आल्यानंतर मृत्यू कशाने झाले हो स्पष्ट होणार आहे, अशी माहिती नरेंद्र चांदेवार यांनी दिली.

घटनेचे माहिती वनविभागाला मिळताच सहायक वन संरक्षक नरेंद्र चांदेवार, उत्तर उमरेडचे वन परिक्षेत्र अधिकारी ए.के.मडावी, दक्षिण उमरेड वन परिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे व अन्य वन कर्मचारी लगोलग घटनास्थळी दाखल झालेत. याशिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे व त्यांचा पोलिस स्टाफ घटनास्थळी दाखल झाला.

''मृत वाघ हा नर असून अंदाजे २ वर्षाचा असावा. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या वाटते. सध्या उमरेड व लगतच्या परिसरात वाघांची संख्या खूप वाढली आहे. कदाचित हा वाघ नवीन अधिवास क्षेत्राच्या शोधात आला असावा.''

- रोहित कारू, मानद वन्यजीव रक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT