Dengue Cases Reported in Last Four Months: जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात डेंगीचे ३१ रुग्ण आढळले आहेत. ४२२ रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. डेंगीचा विळखा घट्ट होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण आढळत असले तरी कोणतीही काळजी न करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डेंगी तापाला न घाबरता नियंत्रणाकरिता योग्य उपचार करावे.
२०२१ च्या तुलनेत यावर्षीचे डेंगीचे प्रमाण कमी आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक डेंगीचे रुग्ण आढळले होते. १ हजार २५४ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यावेळी चार हजार ३३३ रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २०२४ पर्यंत डेंगीचे संशयित मृत्यू १० झाले आहेत. तर २०२२ मध्ये ४०, २०२३ मध्ये ४३९ तर २०२४ मध्ये ४४७ रुग्ण आढळले होते.
डेंगी ताप व डेंगी हिमोरेजिक फिवरचे निदान रक्तजल चाचणीद्वारे केली जाते. डेंगी तापावर निश्चित असे औषधोपचार नाही. रोगलक्षणे अनुसार औषधोपचार करण्यात येतो. तीव्रता येणे, अंगदुखी, डोळ्यांच्या मागील भागात दुखणे, पोटदुखणे, उलट्या व अंग सुजणे अशी लक्षणे दिसताच तत्काळ नजीकच्या शासकीय दवाखान्यात उपचाराकरिता दाखविण्यात यावे, असे आवाहन जि.प. आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी केले.
४२२ रुग्णांच्या रक्ताची चाचणी; काळजी घेण्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
डेंगी विषाणुजन्य आजार असून मानवातील संसर्ग हा विषाणू एडिस इजिप्ती डासांची मादी चावल्यामुळे डेंग्यू आजाराचा प्रसार होतो. डेंगी ताप व रक्तस्त्रावात्मक डेंगी (डेंगी हिमोरेजीक फिवर) हा डेंगी १, २, ३ व ४ विषाणूपासून होतो. त्याचे सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. विषाणूबाधित डासाने चावा घेतल्यानंतर त्याची लक्षणे ५ ते ६ दिवसात दिसून येतात, असेही आरोग्य विभागाने सांगितले.
तीव्र ताप, डोखेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागील भागात दुखणे, रक्तस्त्रावातील डेंगी ताप ही डेंगी तापाची गंभीर अवस्था आहे. तीव्र ताप डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे, पोटदुखी, त्वचेवर पुरळ इ. लक्षणे आढळून येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.