file 
नागपूर

कृषी विभाग म्हणतो, रानभाज्या खा आणि तंदुरूस्त राहा !

चंद्रकांत श्रीखंडे

कळमेश्वर (जि.नागपूर)  :  खापरखुटी, अळू, काटवेल, सूरण, टरोटा, टेना, बांबूचे वायदे, कुंदरभाजी, कुड्याची फुल आणि या सारख्या अनेक रानभाज्यांची नावे ऐकली आहेत हो कधी? या रानभाज्या आरोग्यासाठी फारच पौष्ठीक आहेत असे जाणते सांगतात बरं! आणि या रानभाज्या नक्की कुठे आढळतात? विशेषतः शेतीच्या धुऱ्यावर, डोंगरदऱ्यांमध्ये त्या हमखास आढळतात मित्रांनो ! अलीकडे बाजारात त्यांची मागणी खूप वाढली आहे. त्या आरोग्यासाठी अतिउत्तम आणि पोषक असतात म्हणे ! जंगलात राहणारे आदिवासी बांधव व काही जुनेजाणती मंडळी आजही या भाज्या आवर्जून खातात. पण अनेकांना या वनसंपदेची माहितीच नाही. या उज्वल वनठेव्याची माहिती व्हावी यासाठी आता कृषी विभाग सरसावला आहे.

महोत्सवात होईल रानभाज्यांची ओळख
कळमेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने उद्या रविवारी (ता.९) कळमेश्वर तहसील कार्यालय परिसरात भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कळमेश्वर तालुका वनवैभवाने संपन्न आहे. येथील जंगलात मोठ्या प्रमाणावर दुर्मीळ वनस्पती आढळतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनास उपयोगी रानभाज्यांचा खजिना येथे आहे. मानवी आरोग्यास अतिशय लाभदायी ठरणाऱ्या विविध रानभाज्या जंगलालगत असणारे नागरिक चवीने खातात. तसेच शेतातील माळरानात, बांधांवर, पडिक जमीनीवर आाढळणाऱ्या रानभाज्या जुने शेतकरी आावडीने खातात. पूर्वी आदिवासी बांधव व जुन्या जाणत्या नागरिकांना या भाज्यांची खडानखडा माहिती होती. पण आता मात्र या रानभाज्या, रानफुले, उपलब्ध असून देखील अनेकांना माहीत नाही. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण रानठेवा पूर्णतः दुर्लक्षित आहे.

अधिक वाचा : मुलीचे लग्न मुलाच्या घरी ‘मेसेज’ पाठवून तोडले, म्हणून जन्मदात्रीने उचलले टोकाचे पाऊल....

नवीन पिढीला माहिती मिळणे सुलभ व्हावे
जंगली काटवेल, कुड्याची फुले, कुंदरभाजी, टेना, तरोटा ,खापरखुटी व अशा अनेक रानभाज्या रानफुलांची चव उत्तम असते. याचसोबत त्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहेत.कृषी विभागाच्या वतीने उद्या ९ ऑगष्ट रोजी जिल्ह्यातील संपूर्ण तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात रानभाज्यांचे व रानफुलांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी विभागाची कळमेश्वर तालुक्याची यंत्रणा कामाला लागली आहे. अनुभवी, जाणते व ज्येष्ठ नागरिकांकडून रानभाज्यांची, रानफुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. स्वतः तालुका कृषी अधिकारी कार्यालय या उपक्रमाकरिता प्रकर्षाने परिश्रम घेत आहेत. या उपयोगी रानठेव्याची माहिती प्रदर्शित झाल्यास नवीन पिढीला याची माहिती मिळणे सुलभ होणार असून त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. म्हणून शासनाच्या वतीने या रानभाजी महोत्सवाचे आायोजन करण्यात आाले असून सर्व शेतकऱ्यांसह तालुकावासींनी उपस्थित राहावे असे आावाहन तालुका कृषी अधिकारी जे.पी.नेरलवार यांनी केले आाहे.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT