Gawli 
नागपूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला झाला लॉकडाउनचा फायदा... कसा तो वाचाच

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पॅरोल रजेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाढ केली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे हजर राहणे शक्य नसल्याने पॅरोल रजा वाढवून मिळावी म्हणून उच्च न्यायालयात त्याने याचिका दाखल केली होती. त्यावर, व्हिडीओ काँन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज सुनावणी झाली.

पत्नी आजारी असल्याने १३ मार्च रोजी अरुण गवळी याला ४५ दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार, २७ एप्रिल रोजी हजर रहायचे होते. मात्र, देशांतर्गत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हजर राहणे शक्य नसल्याने अरुण गवळी याने पॅरोल रजा वाढवून मिळावी या विनंतीसह उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. 

सविस्तर वाचा - माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्या नागरिकांसोबत करणार असं...                                                                                        हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा                                                          न्यायालयाने सर्व परिस्थिती बघता त्याच्या रजेमध्ये १० मे पर्यंत वाढ केली आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अँड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT