trafic police 
नागपूर

कारवाई केल्याने भडकला चालक, थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर चढवली व्हॅन

सकाळवृत्तसेवा

नागपूर :  वाहनावर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या चालकाने व्हॅनने वाहतूक शाखेच्या हवालदाराला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात हवालदार थोडक्‍यात बचावला. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भांडे प्लॉट चौकात घडली. घटनेनंतर व्हॅन सोडून चालक पसार झाला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी व्हॅनचालक अरविंद रामजी मेटे (वय 36,रा. जुना बिडीपेठ ) याच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिस हवालदार सुभाष लांडे असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सक्करदतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून,त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा अवैध प्रवासी वाहतूक करतो. 24 फेब्रुवारीला सुभाष लांडे यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करून व्हॅन जप्त केली. त्याला चालान दिले. यावेळी अरविंद याने लांडे यांना पाहूण घेण्याची धमकी दिली. गुरुवारी दुपारी अरविंद याने न्यायालयात दंड जमा केला. पावती दाखवून त्याने व्हॅन सोडविली. त्यानंतर तो सुभाष लांडे यांच्या मागावर होता.

भांडे प्लॉट चौकातील थरारक घटना 
सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास लांडे हे मोटरसायकलने जात होते. त्यांचा मोबाइल वाजला. त्यांनी भांडेप्लॉट चौकात मोटरसायकल उभी केली. ते मोबाइलवर बोलत होते. याचदरम्यान मागून भरधाव व्हॅन चालवून अरविंद याने सुभाष लांडे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वेळीच लांडे बाजूला झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ते खाली पडले. अरविंद हा घटनास्थळीच व्हॅन सोडून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजिद सिद यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी लांडे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली! सिडकोनिर्मित सोसायट्यांच्या पुनर्विकासाला अखेर गती, सुरक्षित घरांच्या दिशेने पाऊल

Year Ender 2025 : सत्ताधाऱ्यांना जनतेनंच खाली खेचण्यापासून ते लोकशाही मार्गाने विजयापर्यंत, जगातील किती देशात झाली निवडणूक?

Viral Video: भाजी खरेदीसाठी चक्क रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन थांबली, व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त

Messi Insurance : भारत दौऱ्यात मेस्सी सामना का खेळत नाही? ₹81,000 कोटींच्या डाव्या पायाच्या विम्याचं कारण काय?

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गट सज्ज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आढावा

SCROLL FOR NEXT