surprise birthday 
नागपूर

Video : लॉकडाऊनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या पीएसआयला मिळाले हे गोड सरप्राईज...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना वाढदिवस साजरा करणे म्हणजे शक्‍यच नाही. ही बाब हेरून सीताबर्डी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या एका पोलिस उपनिरीक्षकाला सरप्राईज देत चक्‍क बंदोबस्ताच्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. तेसुद्धा संगीताच्या सूर आणि लयबद्ध चालीवर. हा प्रकार घडलाय नागपुरातील व्हेरायटी चौकात. गणेश भोयर असे "बर्थ डे बॉय' पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. 

गणेश भोयर हे सीताबर्डी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आज बुधवारी (ता. 15) ला वाढदिवस होता. त्यांना कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करणे शक्‍य नव्हते. याची खंत त्यांना होती. मात्र, सीताबर्डी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पीएसआय भोयर यांना आश्‍चर्याचा धक्‍का देत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. भोयर यांची बंदोबस्त ड्युटी व्हेरायटी चौकात लावण्यात आली होती.

पोलिस अधिकाऱ्यांचा ऑन ड्युटी "बर्थ डे' साजरा 
दुपारी एक वाजताच्या सुमारास तेथे अचानक एक व्हायोलिन वादक आला आणि तो व्हायोलिनवर "बर्थ डे' धून वाजवायला लागला. दरम्यान दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठा केक आणला. भोयर हे अचंबित झाले. मात्र, त्यांना सुखद धक्‍का बसला. जवळपास 25 कर्मचाऱ्यांच्या उपस्थित भोयर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT