नागपूर

महिना जून अन् खून आठ; उपराजधानीतील हत्यासत्र कधी थांबेल

अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीत काही दिवसांपूर्वी सुरू झालेले हत्याकांडाचे सत्र थांबता थांबत नसून शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे चिन्हे आहेत. हत्याकांडाची मालिका थांबविण्याचे पोलिसांना नवे आव्हान आहे. केवळ जून महिन्यात तब्बल आठ खून झाल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मात्र, हत्याकांडाच्या सत्राला जून महिन्याची पार्श्‍वभूमी कायम आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात १७ खून झाले होते, हे विशेष. जानेवारी ते आतापर्यंत ४८ खूनांची नोंद पोलिस दप्तरी आहे. (Eight-murders-in-June-month-in-Nagpur)

गोळीबार चौकातील बागल आखडाजवळ अलोक मातूरकर याने कुटुंबातील पाच सदस्यांचा खून करून स्वत: आत्महत्या करण्याच्या घटनेची उपराजधानीसह राज्यभरात चर्चा आहे. दुसरीकडे एमआयडीसीतील १५ वर्षीय मुलगा राज पांडे याचे अपहरण व हत्याकांडापासून सुरू झालेले हत्यासत्र अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत. सलग होत असलेले हत्यासत्र थांबत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दुपारी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व ठाणेदारांची गुन्हे आढावा बैठक घेतली.

आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगली कानउघडणी करीत आपापल्या हद्दीतील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले. मागील वर्षी जून महिन्यात १७ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यंदा या महिन्यात आतापर्यंत ८ खून झाले आहेत. २०१८ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यात ६५ खून घडले होते. २०१९ मध्ये ५३, २०२० मध्ये ४५ आणि २०२१ मध्ये ४७ खुनांच्या घटनांची नोंद आहे. २०१८ आणि २०१९ च्या तुलनेत खून कमी असून गेल्यावर्षीपेक्षा एक खूनाची घटना यंदा अधिक घडली आहे.

पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. आतापर्यंत हत्याकांडांमध्ये कौटुंबिक वादातून खून झाल्याचे प्रमाण मोठे आहे. गुंडगिरीतून खून झाल्याच्या मोजक्याच घटना आहेत. शहरातील आतापर्यंतच्या हत्याकांडाच्या घटना कोणत्या स्वरूपाच्या आहेत, याचे वर्गीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

(Eight-murders-in-June-month-in-Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT