टेकाडीः गावात बैलांच्या साजाचे साहित्य घेताना शेतकरी. 
नागपूर

बैल पोळा सण आला आठ दिवसांवर, बैलांचा साज विकणारे फिरतात गावोगावी...

सतिश घारड

टेकाडी (जि.नागपूर) : शेतकऱ्यांचा  सर्वात मोठा उत्सव म्हणून बैलपोळा सणाकडे पाहिले जाते. परंतू यंदा बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट आहे. पोळ्यावर निर्भर असलेल्या बैलांच्या साजाचा व्यापारी देखील उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाल्याचे चित्र आहे. अश्यात व्यापारी वर्गाने बैलांच्या सजावटीचे साहित्य गावागावात जाऊन विकायला सुरुवात केली असली तरी बाजारात जी साहित्य विकणे आणि घेण्याची मजा असते, ती दारावर आलेल्या साहित्याला नसल्याचे मत शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या सावटाखाली सणउत्सव
कोरोना संसर्गजन्य रोगाने जिथे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागाला आपल्या विळख्यात घेतले आहे, तिथेच दिवसाला वाढते रुग्ण आणि होणाऱ्या मृत्यूनेदेखील यंदा अनेक सणांवर विरजन टाकले आहे. अशात थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सणाला मोकळीक येणार ही आस शेतकऱ्यांनी लावली होती. परंतू पारशिवनी तालुक्यात वाढती रुग्णसंख्या दुहेरी शतकाकडे पोचलेली असून सहा जणांच्या मृत्यूची नोंद तालुक्यात झालेली आहे. अश्यात कोरोनासंदर्भात शासन बैलपोळा सणाला शिथिलता देईल, हा विचारही निरस्त असल्याने शेवटी कन्हान, कामठीसारख्या शहरात बैलांच्या सजावटीच्या साहित्याचे बाजार लावून गर्दी करण्यापेक्षा व्यापारीवर्गाने शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोळा सणानिमित्त बेल्हे, घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी, रंग, हिंगुळ सर, बेगड, घोगरमाळ, मोरखी या वस्तू मोठ्या प्रमाणात गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या दारात पोहोचून विक्री सुरू केली आहे.

अधिक वाचा : पुराचे पाणीच रोखू शकत नाही, ती कसली बरे संरक्षक भिंत?

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण
ग्रामीण भागात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर शेतात शेतकऱ्यासोबत राबराब राबून परिश्रम करून मोती पिकविणाऱ्या बैलाला पुरणपोळी घालण्याचा हा एकच दिवस असतो. या दिवशी शेतकरी बैलांना खाउपिउ घालतात. वर्षभर सेवा करणाऱ्या बैलांची एक दिवस सेवा केली जाते. यानिमित्त येथील बाजारपेठेत सजावटीच्या विविध वस्तू दिसत होत्या. परंतू बाजारावर सध्या कोरोनाचे सावट असल्याने बाजारात जे साहित्य विकणे आणि घेण्याची मजा असते, ती दारावर आलेल्या साहित्याला नसल्याचे मत शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही व्यक्त केले आहे.           
 

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT