ex mayor role in upcoming nagpur municipal corporation election  
नागपूर

महापालिका निवडणुकीत माजी महापौरांची फौज काय करणार?

राजेश चरपे

नागपूर : विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेच्या स्थापना दिनानिमित्त सर्व महापौरांच्या भेटी घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यामुळे माजी महापौर काय करतात? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापैकी काहींनी वयोमानामुळे राजकारणातून निवृत्ती पत्करली आहे, तर काही पुन्हा एकदा नशीब अजमावण्याच्या प्रयत्नात आहे. 

माजी महापौरांपैकी अटलबहादूरसिंग, कुंदाताई विजयकर, पुष्पाताई घोडे आदी आता सक्रिय नाहीत. मात्र, संदीप जोशी, किशोर डोरले, नरेश गावंडे, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार राजकारणात अद्यापही सक्रिय आहेत. ते पुन्हा लढतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

किशोर डोरले - 
किशोर डोरले यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. रोज महापालिकेच्या मुख्यालयात चक्कर मारल्याशिवाय त्यांना करमतच नाही. निवडणुकीसाठी ते बाशिंग बांधून तयारच आहेत. त्यांना यंदा लढणार का हे विचारण्याची सोयही नाही. 

नरेश गावंडे - 
नरेश गावंडे निवडणुकीच्या माध्यमातून पुन्‍हा नशीब आजमावणार आहेत. लोकांची व कार्यकर्त्यांच्या ते संपकार्त आहेत. त्यांचा आग्रहसुद्धा आहे. वॉर्डाची निर्मिती, आरक्षण आदी सर्व बाबी जुळून आल्यास ते लढण्यास तयार आहेत. 

संदीप जोशी -
संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा आधीच केली आहे. त्यांनी पुन्हा लढावे अशी त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आणि पक्षाचा आदेश झाल्यास जोशी पुन्हा लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अर्चना डेहनकर -
सध्या नगरसेवक नसल्या तरी अर्चना डेहनकर जनता आणि कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात आहेत. सध्या त्या प्रदेश कार्यकारिणीत आहेत. त्यांची प्रतिमासुद्धा चांगली आहे. भाजपच्या माजी महिला नगरसेविकांमध्ये त्या सर्वाधिक सक्रिय आहेत. भाजपने उमेदवारी दिल्यास डेहनकर पुन्हा लढण्यास तयार होऊ शकतात. 

यांची भूमिका महत्त्वाची -
अनेक वर्षे महापालिका गाजवणारे दोन माजी महापौर यंदा निवडणुकीच्या रिंगणात राहणार नाही. विकास ठाकरे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर प्रवीण दटके विधान परिषदेचे सदस्य आहेत. ठाकरे काँग्रेसचे तर दटके भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विषारी दारु प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT