nagpur sakal
नागपूर

आशीष देशमुखांची पक्षातून हकालपट्टी करा

जिल्हा काँग्रेसचा ठराव कमिटीच्या बैठकी मध्ये मांडण्यात आला.

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदारांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून काँग्रेसची जाहीर बदनामी करणाऱ्या माजी आमदार तसेच नवनियुक्त प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीत करण्यात आली. तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला.

रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षातून निलंबित केलेल्या गज्जू यादवांना सोबत घेऊन फिरणारे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावरही कारवाई करण्याची करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यास मंत्री सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नाना गावंडे, उपाध्यक्ष किशोर गजभिये, युथ काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल सिरीया, कुंदा राऊत, सभापती नेमावली माटे यांच्यासह २०० वर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सिरिया यांनी आशिष देशमुख यांना पक्षातून बाहेर काढण्यात यावे, यासंदर्भात बैठकीत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या हिंगणा विधानसभा अध्यक्ष कुंदा राऊत यांनी अनुमोदन केले. दरम्यान लोंढे यांनी प्रस्तावावर मत मागितले. यावेळ ३० ते ४० टक्के कार्यकर्त्यांनाची हात वर केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हा प्रस्ताव पारित करण्यात आला. विशेष म्हणजे देशमुख व राऊत हे दोघेही केदार विरोधक आहेत. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार प्रमुख आरोपी असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. देशमुख या संदर्भाती केंद्रातील काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनाही भेटले होते. त्यानंतर केदारांच्या समर्थकांनी देशमुख भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाती ते गेले होते असेही सांगण्यात येते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत देशमुख यांचे नाव प्रदेश सरचिटणीस म्हणून झळकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Tilekarwadi Post Office Record: टिळेकरवाडीला नवे पोस्ट ऑफिस; आठ दिवसांत १०११ खाती उघडून विक्रमी कामगिरी

SCROLL FOR NEXT