file photo
file photo 
नागपूर

पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ द्या, प्राचार्य फोरमने केली मागणी

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा केवळ ६० टक्केच प्रवेश नोंदविण्यात आले आहेत. यातील जवळपास ७० टक्के प्रवेश नामवंत महाविद्यालयांमध्ये झाले असून इतर महाविद्यालयांमध्ये केवळ तीस टक्के प्रवेश झाले असल्याची माहिती आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबरपासून पदवी प्रवेशाचे सत्र सुरू करण्याचे आदेश दिले असताना ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली आहे.

बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. शिवाय ४० टक्के जागा रिक्त आहेत. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. ती सुरू होताच नामवंत महाविद्यालयात टक्केवारीच्या भरवशावर प्रवेश मिळविणारे बरेच विद्यार्थी प्रवेश रद्द करून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे नामवंत महाविद्यालयातील जागा रिक्त होतील. मात्र, यावेळी विद्यापीठाची प्रवेशाची तारीख निघून गेल्याने या जागा रिक्तच राहिल्या आहेत.

यामुळे महाविद्यालयांना आर्थिक फटका बसला असून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. यामुळे प्राचार्य फोरमने प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. याशिवाय काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमता संपली असल्याने या महाविद्यालयांच्या जागा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्राचार्य फोरमच्या निवेदनावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी तांत्रिकदृष्ट्या मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे सांगितले. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देत विद्यापीठाला पत्र दिल्यास तो प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष डॉ. दिलीप गोतमारे यांच्यासह सचिव डॉ. आर.जी.टाले, माजी अध्यक्ष डॉ. आर.जी भोयर, डॉ. निळकंठ लांजे, डॉ. चेतनकुमार मसराम व पदाधिकारी उपस्थित होते.


काही महाविद्यालयांमध्‍ये जागा रिक्त असूनही तारखा संपल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. दुसरीकडे काही महाविद्यालयात जागाच नसल्याने त्यांनाही जागा वाढवून देण्याची गरज आहे.
- डॉ. आर.जी.टाले, सचिव, प्राचार्य फोरम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

Haldiram: तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड लवकरच परदेशी कंपनीच्या हातात जाणार? सर्वात मोठ्या कंपनीने लावली बोली

SCROLL FOR NEXT