Vidarbha Famous Festival Tanha Pola esakal
नागपूर

Tanha Pola: नागपूरच्या सगळ्यात मोठ्या लाकडी बैलाने वेधले साऱ्यांचे लक्ष

तान्हा पोळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या सगळ्यात मोठ्या लाकडी बैलानं अनेकांचं लक्ष यावेळी वेधून घेतलं आहे

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांच्या कष्टाला ज्याची कायम साथ असते असा शेतकऱ्याचा मित्र बैल. दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात बैलपोळा साजरा केला जातो. त्यानंतर येतो लहान मुलांचा तान्हा पोळा. यंदा नागपूरमध्येही कोरोनाच्या दोन वर्षानंतर हा उत्सव जोरदार साजरा करण्यात आला. तान्हा पोळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या सगळ्यात मोठ्या लाकडी बैलानं अनेकांचं लक्ष यावेळी वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावरही या लाकडी बैलाची जोपदार चर्चा रंगली आहे. (Vidarbha Famous Festival Tanha Pola)

विदर्भ वगळता कुठेही तान्हा पोळा साजरा केला जात नाही. १८०६ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी हा उत्सव सुरू केला होता. लहान मुलांना बैलाचे महत्व कळावे म्हणून त्यांनी लाकडी बैल पोळ्याची सुरूवात केली. रघुजी यांनी लाकडी बैल बनवायला टाकले आणि सगळ्या लहान मुलांत ते वाटले होते. आंब्याचे तोरण लावून, फळं, चॉकलेट, बिस्किट पुडे अशा विविध वस्तूंनी हे तोरण सजवले जायचे.

यात लहान मुलांना लाकडी बैलांसह उभे करून त्यांची पूजा केली जायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून मुलांना खाऊ वाटण्यात यायचा. नागपूरमध्ये असलेल्या मुधोजी राजे यांच्या महाल येथील निवासस्थानी तुम्हाला मोठा लाकडी बैल बघायला मिळेल. या लाकडी बैलाची उंची आठ फूट आणि लांबी सहा फूट असून बैलाच्या पायात चांदीचा तोडा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT